दुचाकीची रेस नको म्‍हणून सांगताच गुप्तीने वार

boy heating
boy heating

जळगाव : दुचाकीची रेस करू नको, जोरात आवाज होत आहे. असे बोलल्याचा राग आल्याने चौघांनी जहारतसाठी आलेल्या तरुणावर दगडफेक करत गुप्तीने वार केले. दरम्यान, दुसऱ्या गटाकडूनही फिर्याद दिल्याने परस्परविरोधी गुन्हा दाखल झाला. 
शहरातील सुप्रिम कॉलनी परिसरातील पोलिस कॉलनीतील रहिवासी जुबेर खाटिक व त्यांचा मित्र अशरफ शहा मेहरूण परिसरातील पीरसय्यद अली दर्ग्यामध्ये जहारतसाठी आले होते. जहारत झाल्यानंतर दोघे झाडाखाली बसले होते. त्याचवेळी जावेद शेख याने मोटारसायकलचे ॲक्सिलेटर वाढत आवाज केला. जुबेरने त्यास विरोध केल्यानंतर जावेद तेथून निघून गेला. 

चौघांनी केले वार 
जावेद काही वेळानंतर त्याचे मित्र मोहम्मद शोएब शेख सलीम ऊर्फ रफत, अमर महबूब तडवी, समीर शेख जावेद या चौघांना सोबत घेऊन येत तो पीरसय्यद दर्ग्याजवळ आला. या वेळी मोहम्मद शोएब याने त्याच्या कमरेला लावलेली गुप्ती काढून जुबेरच्या डाव्या हातावर वार चढविला. जुबेरच्या पोटावर वार होणार तोच जुबेर याने गुप्तीचा पुढील भाग पकडून ठेवला. त्यात त्याच्या हाताला दुखापत झाली. नंतर इतर तिघांनी जमिनीवर पडलेले दगड उचलून जुबेरला फेकून मारले. त्यातही तो जखमी झाला. हल्ला करणारे चौघे तेथून पसार झाले. याप्रकरणी हल्लेखोर जावेद शेख भिकन, मोहम्मद शोएब शेख सलीम ऊर्फ रफत, अमर मेहबूब तडवी, समीर शेख जावेद (सर्व रा. तांबापुरा) यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून, चौघांना अटक झाली आहे. 

परस्परविरोधी गुन्हा दाखल 
दुसऱ्या गटातील मोहम्मद शोएब शेख सलीम याच्या फिर्यादीवरून जुबेर खटिक याच्यासह चार जणांविरुद्धही गुन्हा दाखल झाला. 

बँक खात्यातून दहा हजार परस्पर लंपास 
जळगाव : बँक खात्यातून ऑगस्टमध्ये कुणीतरी दहा हजार रुपये ऑनलाइन काढल्याचा प्रकार शुक्रवारी (ता. २३) उघडकीस आला. शहरातील मुक्ताईनगरातील रहिवासी ॲड. योगेश पाटील यांचे रिंग रोडवरील स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये बचत खाते असून, केलेल्या व्यवहाराच्या सूचना मिळत राहाव्या, म्हणून त्यांनी नोंदणीकृत मोबाईल क्रमांकसुद्धा बँकेकडे दिला आहे. कोरोनामुळे बँकेतील पासबुक नोंदी बंद असल्यामुळे त्यांना काही महिन्यांपासून पासबुकवर नोंदी करता आल्या नाहीत. १४ सप्टेंबरला त्यांना बँक स्टेंटमेंट मिळाले. त्यात त्यांना १८ ऑगस्ट ते ८ सप्टेंबरपर्यंत त्यांच्या खात्यातून एकूण दहा हजार ८४ रुपये काढून घेतल्याची माहिती कळाली. त्यांनी याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसांत तक्रार दिली. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com