स्थानिक निवडणूकीत भाजपला थोपविण्यासाठी आता ‘महाआघाडी’ 

स्थानिक निवडणूकीत भाजपला थोपविण्यासाठी आता ‘महाआघाडी’ 

जळगाव : विधान परिषद निवडणुकीत विजयामुळे राज्यात महाविकास अघाडी ची ताकत दिसून आली आहे. भाजपला थोपविण्यासाठी आगामी काळात स्थानिक निवडणूकीतही महाविकास आघाडीचा प्रयोग करण्यात येईल. असे मत शिवसेना नेते व जिल्हयाचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले. जळगाव येथे शिवसेनेच्या पदाधिकारी बैठकित ते बोलत होते. 

अजिंठा विश्रामगृहावर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेची संघटनात्मक जिल्हा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी आमदार चिमणराव पाटील, आमदार किशोर पाटील, जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, महानगर प्रमुख शरद तायडे, माजी महापौर विष्णू भंगाळे, मनपा विरोधी पक्षनेते सुनिल महाजन, जिल्हा परिषद सदस्य नानाभाऊ महाजन, गोपाळ चौधरी, पद्मसिंग पाटील, मुकुंद नन्नवरे यांच्यासह शिवसेना तालुकाप्रमुख, विधानसभा क्षेत्रप्रमुख आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना पालकमंत्री पाटील म्हणाले की, जिल्हा परिषदेत आपली सदस्य संख्या १५ पेक्षा अधिक नाही. ज्या ठिकाणी आमदार आहेत, तेथेच हे सदस्य निवडून येतात, त्यामुळे यापुढच्या निवडणुकीत ज्या मतदारसंघात आपले आमदार नाहीत, अशी ठिकाणे टार्गेट ठेवून काम करावे लागणार आहे.

भाजपला थोपविण्यासाठी आघाडीचा प्रयोग

विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचा मोठा विजय झाला आहे. त्यामुळे आघाडीची ताकत दिसून आली आहे.आगामी काळात भाजपला थोपविण्यासाठी स्थानिक निवडणुकीत देखील हे प्रयोग केले जातील असे मंत्री पाटील म्हणाले. तसेच पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील यांनी शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडविण्याकडे प्राधान्यने लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगितले. तसेच पारोळाचे आमदार चिमणराव पाटील आगामी काळात महाविकास आघाडीच्या पॅटर्नमुळे येत्या लोकसभा निवडणुकीत ४८ पैकी किमान ४० जागा आपण जिंकू शकतो असे म्हणाले. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com