esakal | माजी खासदार, भाजपचे जिल्हाध्यक्ष हरिभाऊ जावळेंचा कोरोनाने मृत्यू 

बोलून बातमी शोधा

haribhau jawle

हरिभाऊ जावळे यांना कोरोना व्हायरसची लागण झाली होती. तेव्हापासून ते मुंबई येथे उपचारासाठी गेले होते. काही दिवसांपासून मुंबई येथील बॉम्बे रुग्णालयात उपचार सुरु असताना आज त्यांची प्राणज्योत मालावली. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुली, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. 

माजी खासदार, भाजपचे जिल्हाध्यक्ष हरिभाऊ जावळेंचा कोरोनाने मृत्यू 
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जिल्ह्यातील यावल विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार तथा रावेर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार हरिभाऊ जावळे (वय 67) यांचे आज दुपारी साडेबाराच्या सुमारास मुंबई येथे उपचारादरम्यान निधन झाले. जावळे यांना कोरोना व्हायरसची लागण झाली होती. तेव्हापासून ते मुंबई येथे उपचारासाठी गेले होते. काही दिवसांपासून मुंबई येथील बॉम्बे रुग्णालयात उपचार सुरु असताना आज त्यांची प्राणज्योत मालावली. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुली, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. 

अल्पपरिचय 
यावल तालुक्‍यातील भालोद येथील हरिभाऊ जावळे यांचा जन्म 3 ऑक्‍टोंबर 1953 झाला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बालपणापासून स्वयंसेवक तसेच भाजपच्या स्थापनेपासून ते पक्षाशी जुळलेले होते. यावल विधानसभा मतदारसंघाचे एक वेळा त्यांनी प्रतिनिधीत्व केले. त्यानंतर सलग दोनवेळा ते रावेर लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते. 2014ला पुन्हा त्यांनी रावेर मतदार संघातून विधानसभेचे प्रतिनिधीत्व केले. शिवाय, मधुकर सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदाची धुराही त्यांनी यशस्वीपणे सांभाळली होती. 

जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती 
केळी उत्पादकांसाठी त्यांनी भरीव कामगिरी केल्याने त्यांना राज्यातील कृषी विभागातील राज्यमंत्र्यांचा दर्जा असलेली कृषी विज्ञान परिषदेच्या अध्यक्षपदाची जबाबदारीही सोपविण्यात आली होती. याशिवाय त्यांच्या गेल्या सहा महिन्यांपासून भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळत होते. कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना मुंबई येथील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ हलविण्यात आले होते.