कोविड सेंटरमधील बेपत्ता रुग्णाचा मृतदेह पालिकेसमोर 

कोविड सेंटरमधील बेपत्ता रुग्णाचा मृतदेह पालिकेसमोर 
Updated on

वावडे (ता. अमळनेर)  : कोविड सेंटरमधून एक रुग्ण बेपत्ता झाला आणि काही वेळात त्याचा मृतदेह पालिकेसमोर रस्त्यावर पडलेला आढळल्याने खळबळ उडाली असून, कोविड रुग्णालय प्रशासनासह आरोग्य यंत्रणेचा गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. अमळनेरात महिनाभरात दुसऱ्यांदा हा प्रकार घडल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत गांभीर्याने दखल घेऊन तातडीने अहवाल मागविल्याची माहिती माजी आमदार स्मिता वाघ यांनी दिली. 


सुनील दिलभर वानखेडे (वय ३२, रा. वावडे) आरोग्य विभागाने आयोजित शिबिरात स्वॅब घेतल्याने ‘पॉझिटिव्ह’ आला होता. त्यानंतर त्याला १०८ रुग्णवाहिकेने रविवारी (ता. ९) प्रताप महाविद्यालयातील कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, त्याला थोडा त्रास व हाताला जखम असल्याने तेथील अधिकाऱ्यांनी त्याला ग्रामीण रुग्णालयात लक्षणे असलेल्या रुग्णाच्या कक्षात उपचारासाठी पाठविले होते. ग्रामीण रुग्णालयात २० रुग्णांची क्षमता असताना सुमारे ४० जणांवर उपचार करावे लागत असल्याने डॉक्टर आणि अधिकाऱ्यांची तारांबळ उडत आहे. अशातच सकाळी सुनील वानखेडे ग्रामीण रुग्णालयात दिसला नाही म्हणून कर्मचारी व डॉक्टरांनी त्याचा शोध घेतला. मात्र तो आढळून आला नाही. त्याचे जवळचे नातेवाईक व फोन क्रमांकाची नोंद नसल्याने अडचण येत होती. ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. प्रकाश ताडे यांनी अमळनेर पोलिस ठाण्यात जाऊन आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार सुनीलविरुद्ध अमळनेर पोलिस ठाण्यात रुग्ण पळून गेल्याचा गुन्हा दाखल केला. मात्र, सायंकाळी पाचच्या सुमारास सुनीलचा मृतदेह पालिकेसमोर रस्त्यावर पडलेला आढळून आला. त्यानंतर १०८ रुग्णवाहिकेने ताबडतोब त्याचा मृतदेह उचलून ग्रामीण रुग्णालयात नेण्यात येऊन ती जागा सॅनिटाइझ करण्यात आली. 

महिनाभरातील दुसरी घटना 
यापूर्वीदेखील बापू निंबा वाणी हा संशयित रुग्ण प्रताप महाविद्यालयातील क्वारंटाइन कक्षातून बेपत्ता झाला होता. नंतर त्याचा पारोळा तालुक्यात महामार्गावर अपघातात मृत्यू झाला होता. जळगावनंतर अमळनेर तालुक्यात दुसरी घटना घडल्याने माजी आमदार स्मिता वाघ यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे तक्रार केली आणि आधीच्या प्रकरणाची चौकशी झाली नसल्यानेही नाराजी व्यक्त केली. याबाबत जिल्हाधिकारी राऊत यांनी याबाबत गांभीर्याने लक्ष घातले असून, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हा प्रकार झाला आहे का, याबाबत चौकशी करून अहवाल मागविला आहे, असे सांगितल्याचे वाघ यांनी सांगितले. तसेच ग्रामीण रुग्णालयात बंदोबस्ताला असलेले पोलिस अधूनमधून गायब झालेले असतात. याबाबत बैठकीत अधिकाऱ्यांना माहिती दिल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. 

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Khandesh Expressway latest update
ACB Nashik bribery trap operation
Maharashtra cotton sowing delayed due to low rainfall
Why are electric vehicles becoming popular in Maharashtra?
Marathi News Esakal
www.esakal.com