
काळ आला होता पण वेळ नाही; असे म्हटले जाते. परंतु क्रुझर गाडीच्या अपघातातून बचावलेल्या दहा जणांना याचा प्रत्यय आला. गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी रोडावरून खोल भागात खाली पलटी झाली. यात बसलेल्या दहा प्रवाशी जखमी झाले आहेत.
हिंगोणा (जळगाव) : बुरहानपुर अंकलेश्वर रस्त्यावर अडावदकडून बऱ्हाणपूरकडे जाणाऱ्या मोहरदा येथील (एमपी ०९, बीसी. ३६०८) या गाडीमध्ये दहा जण एका कार्यक्रमासाठी गेले होते. हिंगोण गावाजवळ भरधाव वेगात गाडीवरील चालकाचा ताबा सुटल्याने साईडला गाडी आऊटसाईड पलटी झाली.
कार्यक्रम आटोपून घराकडे जात असताना हिंगोणा (ता.यावल) गावाजवळ सदर अपघात झाला. त्यात चालकासह नऊ जण जखमी झाले असून एक गंभीर अवस्थेत आहे. जखमींना परिसरातील नागरिकांनी तात्काळ फैजपुर येथे खाचणे हॉस्पिटलमध्ये औषध उपचारासाठी हलवण्यात आले. फैजपूर पोलीस स्टेशनचे पोलिसांनी एपीआय प्रकाश वानखेडे यांच्या सुचनेवरून पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेऊन जखमींना उपचारासाठी रवाना केले.
वर्षभरापुर्वी येथे परिवार संपला
गतवर्षी मुलीच्या विवाहानंतर वराकडे रिसेप्शनचा कार्यक्रम आटोपून घरी जात असताना परिवारावर घाला घातला होता. तो अपघात याच जागेवर काही अंतरावर चिंचोली मेहून येथील एका गाडीला राखेचा भरुन जाणाऱ्या डंपरने ठोस दिली होती. त्यात दहा ते अकरा जण दगावले होते. त्या परिसरात ही घटना घडली असून हिंगोणा सांगवी भालोद परिसरातील नागरिकांनी घटनास्थळावर धाव घेतली.
संपादन ः राजेश सोनवणे