बीव्हीजी रूग्‍णवाहिकेच्या डॉक्‍टराची आत्‍महत्‍या

doctor suicide
doctor suicide

जळगाव : महाबळ परिसरातील एका तरुण डॉक्टरने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. 
धरणगाव तालुक्यातील साळव- नांदेड येथील मूळ रहिवासी व सध्या जळगावात महाबळ परिसरात वास्तव्यास असलेले डॉ. विद्याधर लिलाधर पाटील यांची पत्नी नागपूर येथे आरोग्य विभागात नोकरीस असल्याने ते घरी एकटेच राहत होते. 

मोबाईल होता बंद
नातेवाईकांनी फोन लावला असताना दोन दिवसांपासुन मोबाईल बंद येत होता. तसेच त्यांच्या घराचा दरवाजा देखील बंद असल्याने नातेवाईकांनी त्यांच्या घरी जाऊन पाहणी केली असता पाटील यांनी छताला दोरीने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे त्यांना दिसून आले. घटनेची माहिती पोलिसांना दिली दिल्यानंतर पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केला. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 
 
मृत्यूचे कारण अस्पष्ट 
डॉ. विद्याधर पाटील हे याआधी बीव्हीजी ग्रुपमध्ये नोकरीस होते. वर्षभरापूर्वी त्यांची बदली शासकीय रुग्णालयात झाली. ते १०८ क्रमांकाच्या रुग्णावाहिकेत डॉक्टर असल्याचे समजते. डॉ. पाटील यांनी आत्महत्या करण्याचे इतपत टोकाचा निर्णय का घेतला याबाबत अद्याप कळू शकले नाही. त्यांच्या पश्‍चात आई- वडील पत्नी असा परिवार आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com