esakal | काळोख्या रात्रीचा थरार..कुटूंब गाढ झोपेत आणि मांजर-नागाची झुंज
sakal

बोलून बातमी शोधा

Indian cobra and cat

काळोख्या रात्रीचा थरार..कुटूंब गाढ झोपेत आणि मांजर-नागाची झुंज

sakal_logo
By
टीम ई सकाळ

जळगाव : रात्री साडेतीनची वेळ...पिंप्राळ्यातील प्रशांत चौकात राहणारे कुटुंबीय (Family) गाढ झोपेत... अचानक पलंगावर झोपलेल्या मुलाला मांजरीच्या (Cat)फिस्करण्याच्या आवाजाने जाग आली. समोरचे दृश्य पाहून त्यांचे अवसान गळाले...जमिनीवर झोपलेल्या कुटुंबातील सदस्यांना नागापासून (Indian cobra snack) वाचविण्याच्या प्रयत्नात मांजरीची त्या नागाशी झटापट सुरू होती.

(cat saved the sleeping family from the cobra)

हेही वाचा: भावी पत्नी, सासूला घरी सोडले, थोड्यावेळात आली अपघाताची बातमी

अनंत कोळी यांच्या कुटुंबातील चार महिला जमिनीवर झोपलेल्या होत्या. त्यांच्याजवळ मांजर अंगावरचे सगळे केस ताठ करून फिस्करत होती. कारण मांजरासमोर काळरात्र बनून आलेला नाग (इंडियन स्पेक्टॅकल कोब्रा) होता. मुलाने जोरात ओरडत सर्वांना उठवले. इकडे नाग आणि मांजराची लढाई सुरू असतानाच वन्यजीव संरक्षण संस्थेचे सर्पमित्र गणेश सोनवणे यांना पाचारण करण्यात आले.

Indian cobra

Indian cobra

नागाल सोडले सुरक्षीत अधिवासात

सहकारी अजय साळवे यांना घेऊन ते घटनास्थळी पोचले. तोपर्यंत मांजर हवालदिल झाली होती. श्री. सोनवणे यांनी कुशलतेने नाग ताब्यात घेतला आणि कुटुंबीयांचा जीव भांड्यात पडला. अनंत कोळी यांनी गणेश सोनवणे यांचे आभार मानत वन्यजीव संरक्षण संस्था करीत असलेल्या कार्याचे कौतुक केले. नागाला फारशी उपचाराची गरज नसल्याने मानद वन्यजीव रक्षक रवींद्र फालक आणि बाळकृष्ण देवरे यांना माहिती देत तत्काळ सुरक्षित अधिवासात मुक्त केले.

हेही वाचा: बंधाऱ्यात बैलगाडी उलटून आतेभाऊ-मामेभाऊचा बुडून मृत्यू

माझ्यापेक्षा त्या मांजराचे आभार मानले पाहिजे. या दिवसात खाली झोपलेल्या नागरिकांना सर्पदंश होण्याचा धोका जास्त असल्याने खाली झोपणे टाळा, स्वच्छता ठेवा.
-गणेश सोनवणे, सर्पमित्र

loading image