धोबी समाजाची ऑनलाइन जनगणना होणार !

देविदास वाणी
Wednesday, 2 September 2020

आरक्षण सर्वेक्षणामुळे रखडले असल्याची स्पष्ट कबुली मंत्र्यांनी दिली होती. यावर उपाययोजना म्हणून ऑनलाइन आरक्षणाचा निर्णय झाला. 

जळगाव  ः राज्यातील धोबी समाजाची कुटुंबनिहाय ऑनलाइन जनगणना व सर्वेक्षण करून शासनाला सादर करून पडताळणी व प्रमाणित करण्याचा तोडगा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्र राज्य परीट (धोबी) सेवा मंडळाची विशेष ऑनलाइन सभा झाली. 

संघटनेचे संस्थापक व समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष बालाजीराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली 
प्रदेशाध्यक्ष विवेक ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या निर्णायक बैठकीचे प्रास्ताविक प्रदेश कार्याध्यक्ष गणेशराव जगताप यांनी केले. सुमारे राज्यभरातील ८५ पदाधिकारी बैठकीत सहभागी झाले होते. 

 

आंबेजोगाई (जि.बीड) येथे धोबी संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांना भेटले. या बैठकीत परीट (धोबी) आरक्षण सर्वेक्षणामुळे रखडले असल्याची स्पष्ट कबुली मंत्र्यांनी दिली होती. यावर उपाययोजना म्हणून ऑनलाइन आरक्षणाचा निर्णय झाला. 

जोपर्यंत धोबी समाजाच्या सर्वेक्षणाची माहिती व ठोस आकडेवारी उपलब्ध होत नाही, तोपर्यंत केंद्राला राज्य सरकार शिफारस पाठवणार नाही असे मंत्री मुंडे यांनी सांगितले होते. यामुळे राज्य मागासवर्गीय आयोगावर अवलंबून न राहता आरक्षणाचा विषय मार्गी लागावा म्हणून संघटनेच्या ऑनलाइन बैठकीत येत्या सहा महिन्यात समाजाची ऑनलाइन जनगणना करून शासनाला आकडेवारी सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

निमंत्रक प्रदेश महासचिव संजय भिलकर, कोअर कमिटीचे मुख्य समन्वयक कचरू पाचंगरे, ज्येष्ठ उपाध्यक्ष बन्सीलाल कदम, उपाध्यक्ष राजेंद्र सोनवणे, माजी कार्याध्यक्ष ईश्वर मोरे, राज्य संघटक विलासराव जाधव, गंगाधर निमलवार, महिला प्रदेशाध्यक्ष प्रतिभाताई गवळी, युवक प्रदेशाध्यक्ष संजय वाल्हे, महाराष्ट्र डेबूजी फोर्सचे प्रदेशाध्यक्ष कैलासराव तेलंग, परभणी जिल्ह्याचे नेते भास्कर मोताळे, मराठवाडा विभागीय अध्यक्ष शंकरराव बनसोडे, आरक्षण हक्क परिषदेचे कार्यवाहक दीपक सपकाळे, पुणे विभाग अध्यक्ष दीपक जगदाळे, मराठवाडा विभागीय युवक अध्यक्ष अॅड. सुधीर जाधव, बीड जिल्हाध्यक्ष सचिन जाधव, परभणी जिल्हाध्यक्ष प्रसाद शिंदे, नागपूर जिल्हाध्यक्ष अरुण मोतीकर, आरक्षण प्रक्रियेचे अभ्यासक गिरीश राऊत, मराठवाडा विभागीय सचिव साईनाथ हजारे, युवा नेते विवेक चिंचवड, साक्षी चिंचवड आदी नेते व समाजबांधवांनी आपापली भूमिका विषद करून जोरकसपणे ऑनलाइन जनगणना मोहीम राबविण्याचा मनोदय व्यक्त केला. 

कोअर कमिटी सदस्य कमलताई पालकर, प्रमोदराव चांदूरकर, सागर परीट, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष आनंदराव शिंदे, सांगली जिल्हाध्यक्ष संताजीराव शिंदे, विदर्भ विभागीय युवक अध्यक्ष अमोल डंबेलकर, बुलढाणा जिल्हाध्यक्ष समाधान भातुरकर, भंडारा जिल्हाध्यक्ष श्याम भिलकर, सोशल मीडिया राज्य प्रभारी अँड.अमोल नवले, धुळे जिल्हा महिलाध्यक्षा मायाताई मोरे, मराठवाडा विभाग प्रसिद्धी प्रमुख संतोष शिंदे, संजय बोरसे, प्रा.गिरधर तेलंग, क्रांतिकुमार भोजेकर, योगेश जाकरे, बाळू इकळीकर, अनिल गायकवाड, भाग्यश्री ईबितदार, दत्ताभाऊ जाधव, काशीनाथराव तेलंग, जनार्दनजी घोडके, अरविंद राऊत,बापू वाघमारे, मकाजी बेंद्रे, प्रवीण साळुंखे, जितेंद्र खर्चाणे, राकेश परिट, गुरुदास शिंदे, अभिजित सांगावकर, प्रभाकर रोहणकर, नारायण टोके, नयन होळपकर, भरत राऊत प्रभाकर होरर्णेकर, किशोर घोडके आदी पदाधिकारी व समाजबांधव सहभागी होते.

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon census of the dhobi community will be online