अंडरपासबाबत नागरिक ‘नही’च्या कार्यालयावर धडकले 

देविदास वाणी
Friday, 4 December 2020

अंडर पास वे तयार करावा या मागणीसाठी आज येथील नागरिकांसह राजकीय पदाधिकाऱ्यांनी महामार्ग प्राधिकरणाच्या (नही) कार्यालयावर धडक दिली.

जळगाव  ः शहरातून जात असलेल्या चौपदरीकरण मार्गावर सालार नगर- मिल्लत नगर अकसा नगर -मास्टर कॉलनी हा परिसर सुमारे तीस ते चाळीस हजार लोकवस्तीचा आहे.  या नगरात जाण्यायेण्यासाठी अंडर पास वे तयार करावा या मागणीसाठी आज येथील नागरिकांसह राजकीय पदाधिकाऱ्यांनी महामार्ग प्राधिकरणाच्या (नही) कार्यालयावर धडक दिली. 

आवश्य वाचा- स्‍टेजवर साफसफाई करणारा युवराज ‘इंडियन आयडॉल’च्या रंगमंचावर येतो तेव्हा.

या नगरात महामार्गावर कोणत्याही प्रकारचा अंडरपास नसल्याने मागील वर्षापासून परिसरातील नगरसेवक, नागरिक राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या (नही) अधिकाऱ्यांना भेटून, खासदार, आमदार, महापौर व सामाजिक संघटनेचे विविध पदाधिकारी भेटून अंडरपास वे करावा असा रेटा लावीत आहे. अद्याप प्राधिकरणाने अधिकृतरीत्या कोणतीही कारवाई केली नसल्याने आज शहरातील सर्व राजकीय पक्षप्रमुख, शाळेचे प्रमुख, राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष(अल्पसंख्याक) मझर खान, काँग्रेसचे शहर प्रमुख नदीम काझी, मनसेचे अध्यक्ष जमील देशपांडे, शिवसेना महानगर अध्यक्ष झाकीर पठाण, मार्क्सवादीचे अकिल पठाण, मील्लत हायस्कूल चे मुख्याध्यापक मुश्ताक मीर्झा, शाह बिरादरी शाळेचे प्रमुख जाहिद शाह, अकसा बॉईज फाउंडेशनचे ॲड. अमीर शेख यांच्यासह जाऊन महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयात धडक दिली. 

आवर्जून वाचा- अहंपणाच्या नेतृत्वामुळेचं भाजपचा पराभव- एकनाथ खडसे

शिष्टमंडळाने उपस्थित अधिकारी वर्गास आपल्या मागण्या व महामार्गाचे म्हणणे लेखी स्वरूपात मागितले असता कार्यालयात उपस्थित उपव्यवस्थापक पंकज प्रसाद, साईट इंजिनिअर विश्वजित बागळकर, सी. एस. गायकवाड, प्रोजेक्ट डायरेक्टरचे स्टेनो सुभाष राऊत यांनी शिष्टमंडळाशी चर्चा केली. प्रोजेक्ट डायरेक्टर चंद्रकांत सिन्हा हे जळगावी कार्यालयात आल्यावर योग्य तो लेखी अहवाल देण्यात येईल असे सांगितले. 

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon citizens hit the 'NHI' office regarding the underpass on the highway