कसं होणार ! संचारबंदीतही नागरिक रस्त्यावरच

अनेकांनी रस्ता बदलला मात्र रस्तयावर ये्ण्याचे टाळलेली नाही. कोरोना हरवायचे असेल तर सर्वच एकावेळी लॉकडाऊन करा.
corona
coronacorona
Updated on: 

जळगाव ः राज्यात कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी ‘संचारबंदी’ जाहीर केली आहे. मात्र अत्यावश्‍यक सेवा, बँका सुरू असल्याने नागरिक या ना त्या कारणाने रस्तयावर फिरताना दिसत आहे. अनेक ठिकाणी गर्दी करतानाचे चित्र आज पहावयास मिळाले.

शासनाने संचारबंदी केली असली तरी अनेक व्यवसायांना घरपोच डिलेव्हरी देण्यास सांगीतले आहे. किराणा, भाजीपाला, फळे रस्तयावर विकली जात आहे. बँका सुरू आहेत. या वस्तू घेण्यासाठी नागरिक रस्त्यावर येताना दिसतात. पोलिसांनी काही ठिकाणी अडवून त्यांची कोरोना टेस्ट केली. यामुळे अनेकांनी रस्ता बदलला मात्र रस्तयावर ये्ण्याचे टाळलेली नाही. कोरोना हरवायचे असेल तर सर्वच एकावेळी लॉकडाऊन करा, असा सुर आता उमटू लागला आहे.

पोलिसांकडून कडक निर्बंध करण्याची गरज

एकीकडे अत्यावश्‍यक सेवेच्या नावाखाली दूसरीही दूकाने आडमार्गाने सुरू आहेत. मात्र ज्यांची दूकाने बंद आहेत त्यांची रोजीरोटी केली आहे. संचारबंदी हा मोठा पर्याय शासनाने काढला. मात्र त्याऐवजी संपूर्णतः लॉकडाऊन किमान आठवडाभर ठेवला तरी चालेल, मात्र काही बंद काही सुरू यामुळे नागरिकांत संभ्रम निर्माण झाला आहे. पोलिसांनी कडक निर्बंध केले तर किमान दिवसाची गर्दी टळेल व कोरोना वाढणार नाही हे नक्की.

नागरिक रस्त्यावर..

कोरोनाची साखळी तोडण्यसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंधरा दिवसाचा लाॅकडाऊन जाहीर केला आहे. परंतू संचारबंदी असतांना देखील नागरीक रस्त्यांवर दिवसा फिरत असतांना दिसत आहे. शुल्लक कारणासाठी देखील नागरीक फिरत आहे. पोलिस केवळ नावालाच काही चौकात दिसत आहे.

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Nandurbar bribery case
Jalgaon Engineer Incident
Jalgaon Mother and Son Case
Girna Dam Water Storage
Marathi News Esakal
www.esakal.com