हत्या की आत्महत्या...तरूणाच्या हातावर जखमा अन्‌ जवळ दारूची बाटली 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 19 June 2020

मूळचा उत्तर प्रदेशमधील बिहार गंज येथील रहिवासी सुर्यकांत राममिलन गिरी (वय 30) असे मयत तरुणाचे नाव आहे. गेल्या काही महिन्यांपासून सुर्यकांत गिरी हा शाहूनगरातील विजय मिश्रा यांच्याकडे कामाला होता. तर रेल्वे स्टेशन परिसरातील विलास लॉजवर राहत होता. गुरुवारी सायंकाळी सुर्यकांत हा शामा प्रसाद मुखर्जी उद्यानाच्या परिसरात फिरत होता.

जळगाव : शहरातील जिल्हा परिषदेसमोरील शामा प्रसाद मुखर्जी उद्यानाला लागून असलेल्या दुकानाच्या ओट्यावर एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. या तरुणाच्या हातावर जखमा असल्याने ही हत्या आहे आत्महत्या याबाबत पोलिसांकडून तपास केला जात आहे. याप्रकरणी शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

मूळचा उत्तर प्रदेशमधील बिहार गंज येथील रहिवासी सुर्यकांत राममिलन गिरी (वय 30) असे मयत तरुणाचे नाव आहे. गेल्या काही महिन्यांपासून सुर्यकांत गिरी हा शाहूनगरातील विजय मिश्रा यांच्याकडे कामाला होता. तर रेल्वे स्टेशन परिसरातील विलास लॉजवर राहत होता. गुरुवारी सायंकाळी सुर्यकांत हा शामा प्रसाद मुखर्जी उद्यानाच्या परिसरात फिरत होता. आज सकाळी त्याचा मृतदेह उद्यानाला जलागून असलेल्या भगवती जनरल स्टोअर्सच्या ओट्यावर आढळून आला. मृतदेहाच्या शेजारीच बियरची बाटली फोडलेली होती तर सुर्यकांत याच्या हाताला जखमा झालेला असल्याचेही पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आला आहे. दरम्यान पोलिसांनी सुर्यकांत यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली आहे. 

तीन दिवसांपूर्वी केला होता असा प्रयत्न 
सुर्यकांत गिरी हा शहरात काम करुन आपला उदनिर्वाह करीत होता. गेल्या तीन दिवसांपूर्वी सुर्यकांत याने अशाच प्रकारे हाता पायावर तिक्ष्ण वस्तूने वार करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे त्याने आत्महत्याच केली असावी असा अंदाज पोलिसांकडून वर्तविला जात आहे. 

पोलिसांची घटनास्थळी धाव 
शामाप्रसाद मुखर्जी उद्यानाजवळ मृतदेह आढळून आल्याची माहिती कळताच शहर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी परिसरातील नागरिकांना विचारपूस केली असता हा तरुण सायंकाळच्या सुमारास याच परिसरात फिरत असल्याचे कळले. 

लॉजवाल्यांनी पटविली ओळख 
सुर्यकांत गिरी हा श्रेल्वे स्थानकावजळील विलास लॉज येथे राहत होता. पोलिसांनी संपूर्ण परिसरात ओळख पटविण्यासाठी फिरत असतांना त्याची ओळख लॉजवाल्यांनी पटविली. सुर्यकांत यांची हत्या झाली की आत्महत्या आहे याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. याप्रकरणी सतिष न्याती यांच्या खबरीवरुन शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon city gardan yound boy death police serching