अरे देवा...कोरोनाच्या तक्रारी निवारण करणाऱ्याचा अहवाल आला पॉझिटिव्ह ! 

अरे देवा...कोरोनाच्या तक्रारी निवारण करणाऱ्याचा अहवाल आला पॉझिटिव्ह ! 
Updated on: 

जळगाव ः जळगाव जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून गुरूवारी सायंकाळी 135 कोरोना बाधितांचा अहवाल आला होता. या अहवालात जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनाची एन्ट्री झाल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात एकच खळबळ उडाली. 

जळगाव शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढतच आहे. दररोज कोरोना पॉझीटिव्ह रुग्णांची संख्येचा आकडा हा वाढताच येत आहे. त्यात जळगाव शहरात 367 कोरोना रुग्णांची संख्या झाली असून परिस्थीती गंभीर होत चालली आहे. त्यात गुरूवारी 135 जणांचा आलेल्या अहवालात जिल्हा रुग्णालयातील राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य यंत्रणा (एनआरएचएम) च्या कर्मचाऱ्याची जिल्हाधिकारी कार्यालयातील महिन्याभरापूर्वी कोवीड-19 "वॉर' रुम तयार केला होता. या रुम मधून जिल्ह्यातील सर्व "कोरोना' अपेडट व त्यावर नियंत्रण तसेच तक्रारी निवारण आदी सेवा सुरू करण्यात आल्या होत्या. या रुम मध्ये जिल्हाधिकारी कार्यालय, सिव्हील हॉस्पीटल तसेच महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती. 

जिल्हाधिकारी कार्यालयात खळबळ... 
जळगाव शहरातील विविध भागात कोरोना बाधित रुग्णे आढळून येत आहे. त्यात आता शासकीय कार्यालयात देखील कोरोनाने एन्ट्री केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात वॉर रुम मध्ये 35 वर्षीय कर्मचाऱ्याचा "कोरोना' पॉझिटिव्ह अहवाल आल्याने "वॉर' रुम मधील कर्मचाऱ्यांधे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Maharashtra Crime News Newly Married Woman Accused in Poisoning Incident Involving Husband and Two Others in Jalgaon
Solapur Municipal Clerk Mouli Without Both Hands Performs Aarti In Inspiring Moment At Deepstambh Foundation Event
Jalgaon gold price
Jalgaon Scrap Market, Municipal Land, Transport Nagar
Marathi News Esakal
www.esakal.com