आपल्या मराठी माणसाचे ठाकरे सरकार जबाबदार असे चिठ्ठीत लिहून एसटी कंडक्टरने घेतला गळफास !

भूषण श्रीखंडे
Monday, 9 November 2020

कमी पगार, एस. टी. महामहामंडळाकडून अनियमीत दिला जाणारा पगाराच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत आहे. यास जबाबदार एस. टी. महामांडळाची कार्यपद्धती व आपल्या मराठी माणसाचे ठाकरे सरकार आहे.

जळगाव ः कमी पगार, तसेच एसटी महामंडाळाची अनियमीत कार्यपद्धती व याला जबाबदार ठाकरे सरकार अशी सुसाईड चिठ्ठी लिहून आज जळगाव आगारातील तीस वर्षीय तरुण कंडक्टरनने आपल्या घरी गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली. ही घटना सकाळी आठ वाजता उघडकीस आली. त्यामुळे जळगाव आगार तसेच शहरात आज एकच खळबळ उडाली.  

जळगाव एस. टी. महामंडाळाच्या आगारात कार्यरत मनोज अनिल चौधरी (वय ३०, रा. रायपुर.कुसूंबा) हे मिळत असलेला कमी पगार त्यात एसटी महामंडाळ्याच्या अनियमीत कारभारामूळे नैराश्यात होते. आज सकाळी आठ वाजता राहत्या घरी आत्महत्या केली. या घटनेमुळे खळबळ उडाली असून नातेवाईकांनी एसटी महामहामंडाळाकडून कमी दिला जात असलेला पगार देण्यामुळे आत्महत्या केली असल्याचा आरोप केला आहे. तसेच मृत मनोज चौधरी यानी गळफास घेण्यापूर्वी सुसाईड चिठ्ठी लिहून ठेवली असून यात कमी पगार, एस. टी. महामहामंडळाकडून अनियमीत दिला जाणारा पगाराच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत आहे. यास जबाबदार एस. टी. महामांडळाची कार्यपद्धती व आपल्या मराठी माणसाचे ठाकरे सरकार आहे. माझ्या घरच्यांचा यात काही संबंध नाही. महामंडाळाने व संघटनाने माझा पीएफ व एलआयसी माझ्या परिवारासर मिळून देण्यासाठी प्रयत्न करावा असे चिठ्ठीत लिहून आत्महत्या केली आहे. 

जिल्हा रुग्णालयात नातेवाईंकाचा गोंधळ
जिल्हा रुगणालया मृत मनोज चौधरी यांच्या नातेवाईकाच्या मन हेलावणारा अक्रोश पाहण्यास मिळाला. तर जो पर्यंत एस. टी. महामांडळाचे अधिकारी येवून आश्वासन देत नाही तो पर्यंत मृतदेह उचलणार नाही असा पवित्रा घेतल्याने एकच गोंधळ उडाला होता.   
 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon conductor of Jalgaon ST Corporation depot committed suicide by hanging himself due to low salary