
कार्तिकी एकादशी या तिथीला प्रभू श्रीरामाचा भारतात निघणारा हा एकमेव श्रीरामरथ आहे. या रथोत्सवाला दिडशे वर्षाची परंपरा असून या दिवशी संपूर्ण जळगाव शहरात श्रीरामाचा रथ मार्गक्रमण करत असतो.
जळगाव ः दिडशे वर्षापूर्वीचा परंपरा असलेलेल्या जळगावच्या श्रीराम रथोत्सवर यंदा कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीकोनातून रथोत्सव पाच पाऊले ओढून साजरा करण्यात आला. तसेच गर्दी टाळण्याच्या दृष्टीकोनातून भाविकांना आॅनलाई दर्शनाची सुविधा करण्यात आली. तर रथ चौकात गर्दी होवू नये यासाठी प्रशासनातर्फे यंदा प्रथमच रस्ते बंद करून दोन लेअरची सुरक्षा रथाला करण्यात आली. रथ चौक, मंदिर परिसरात केवळ पुजारी सेवेकरींना प्रवेश दिला जात आहे.
आवश्य वाचा- अमृत’मुळे साडेपाच लाख जळगावकर वेठीस
कार्तिकी एकादशी निमित्त जळगाव शहराची दिडेश वर्षाच्य परंपरेला आज प्रथम कोरोनामुळे ब्रेक लागला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता श्रीराम मंदिर संस्थाने रथोत्सवाला ब्रेक लावत आज मंत्रोपचारात विधिवत पुजा करून तसेच पाच पाऊले रथ ओढून रथोत्सव साजरा केला.
कार्तिकी एकादशीला भारतात निघणारा एकमेवर रथ
कार्तिकी एकादशी या तिथीला प्रभू श्रीरामाचा भारतात निघणारा हा एकमेव श्रीरामरथ आहे. या रथोत्सवाला दिडशे वर्षाची परंपरा असून या दिवशी संपूर्ण जळगाव शहरात श्रीरामाचा रथ मार्गक्रमण करत असतो. जागो जागी रथाचे पुजन व भाविका दर्शन घेण्यासाठी येत असतात. रात्री बारा वाजता मुळ रथचौकात रथ येवून रथोत्सवाची सांगता महाआरती करून केली जाते असते.
रथाचे विधिवत पुजन
आज जलग्रामदैवत रामभक्तांची अयोध्या वारकऱ्यांची पंढरी असलेले श्रीराम मंदिर संस्थान येथे पहाटे ४:०० वाजता काकडा आरती झाली. प्रभुश्रीराम रायांच्या रथावरील उत्सव मुर्तीस महा अभिषेक, सकाळी आठ वाजता मंगलारती, सकाळी परंपरेचे चक्रीभजन, श्रीराम रथ चौकात सकाळी १०:३० वाजता श्रीराम मंदिर संस्थानचे उत्तराधिकारी वेदमूर्ती ह. भ. प. श्रीराम महाराज जोशी यांच्या हस्ते श्रीराम रथाचे पूजन व महाआरती झाली.
सायंकाळी ०६:३० वाजता सायंआरती धुपारती व सायंकाळी ०७:३० वाजता भजन, रात्री १२:०० वाजता होईल.
आवर्जून वाचा- वडीलांचे ते शब्द भिडले हृदयाला; मग काय घर सोडले आणि रसवंतीवर करू लागला काम
रस्ते केले बंद
रथ चौकात कोरोनाच्या दृष्टीकोनातून गर्दी होवू नये यासाठी रथ चौकात कोणी दर्शनासाठी न येता आॅनलाईन दर्शन घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. तरी शनिपेठ, शनीमंदिर, सराफ गल्लीतील काल भैरवनाथ मंदिर, भावसार मंगल कार्यालय, आर. एल. शोरूम चौफुली येथील रस्ते बँरेकेटींग करून बंद केले आहे. तर रथ चौकात बॅरेकेटींग करून पुजारी व सेवेकरी यांनाच रथ व मंदिर परिसरात जावू दिले जात आहे.