निधीच नाही तर... नियोजन कसले करणार?‘डीपीडीसी’बैठकीला ‘खो’ 

निधीच नाही तर... नियोजन कसले करणार?‘डीपीडीसी’बैठकीला ‘खो’ 
Updated on

जळगाव  : नव्या आर्थिक वर्षात जिल्हा नियोजन समितीची बैठक जून किंवा जुलै महिन्यात अपेक्षित असते. मात्र ‘कोरोना’मुळे बैठका घेऊन अधिकारी, कर्मचारी जमा करण्यास मनाई आहे. सोबतच यंदा जिल्हा नियोजन समितीला मिळणाऱ्या निधीपैकी फक्त ३३ टक्के निधीच उपलब्ध होणार आहे. त्यातील २५ टक्के निधी कोरोनावर खर्च करायचा आहे. राहिलेल्या निधीत विकासाचे काय नियोजन करायचे, असा प्रश्‍न जिल्हा प्रशासनासह पालकमंत्र्यांना पडला आहे. यामुळे या आर्थिक वर्षातील जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली नाही. 


जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा नियोजन समितीचे नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील यांनी २०२०-२१ वर्षात ३७५ कोटींचा कृती आराखडा तयार केला होता. तो शासनाकडे मार्चपूर्वीच पाठविला. मात्र मार्चअखेरपासून ‘कोविड’चे सावट देशभरासह राज्य, जिल्ह्यात आले. त्यात लॉकडाउन असल्याने शासनाच्या कंपनी, दुकाने, सर्वच बंद. शासकीय करापोटी येणारा निधीही थांबला. यामुळे शासनाला आर्थिक ताळेबंद राखण्यात काटकसर करावी लागली. याचाच परिणाम म्हणून या वर्षातील सर्व नवीन योजनांना ब्रेक देण्यात आला. जो निधी देण्यात आला हेाता. त्यातील ७० टक्क्यांवर कपात करण्यात आली. जळगाव जिल्ह्याला ३७५ कोटींचा ३३ टक्केच निधी (१२३ कोटी) येणार आहे. त्यातील २५ टक्के म्हणजेच ३१ कोटी कोरोनावर उपायासाठी खर्च करण्यास सांगण्यात आले आहे. त्यांपैकी १० कोटींचा निधी आतापर्यंत कोरोनावर उपायांसाठी देण्यात आला आहे. 

नऊ आमदारांचे पाच कोटी 
जिल्ह्यातील नऊ विधानसभा व दोन विधान परिषदेच्या अशा ११ पैकी नऊ आमदारांनी आमदार निधीतील प्रत्येकी ५० लाखांचा निधी कोरोनावर उपाययोजनेतील साहित्य खरेदी, ऑक्सिजन सिलिंडर आदी वस्तू घेण्यासाठी दिला आहे. आमदार गिरीश महाजन, आमदार लताताई सोनवणे यांनी आमदार निधी कोरोनावर उपायांसाठी दिलेला नाही. ते वगळता इतर सर्व आमदारांनी निधी दिला आहे. यामुळेच तालुकास्तरावरील ग्रामीण रुग्णालय, कोविड केअर सेंटरमध्ये बेड्स, ऑक्सिजन पाइपलाइन आदी कामे होत आहेत. 
 

 संपादन- भूषण श्रीखंडे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Girna Dam Water Storage
Ganesh Idol Broken News
Jalgaon flyover collapse contractor FIR
Jalgaon bypass one way traffic
Marathi News Esakal
www.esakal.com