जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग होतोय कमी; तेरा तालुक्यांत नव्या रुग्णांची एकअंकी संख्या

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग होतोय कमी; तेरा तालुक्यांत नव्या रुग्णांची एकअंकी संख्या
Updated on: 

 जळगाव : गेल्या काही दिवसांपासून कोरोना संसर्गाचा आलेख खाली येत आहे. बुधवारी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील पंधरापैकी जळगाव शहर व भुसावळ वगळता अन्य तेरा तालुक्यांमध्ये नव्या बाधितांची संख्या अवघी एकअंकी असून दोन तालुक्यांत तर एकही नवा रुग्ण सापडला नाही. बुधवारी तिघांच्या मृत्यूसह एकूण बळींची संख्या १२३३वर पोचली आहे. 

जळगाव जिल्ह्यात जुलै व ऑगस्ट हे दोन्ही महिने कोरोनाच्या तीव्र संसर्गाचे राहिल्यानंतर सप्टेंबरपासून नव्या बाधितांचा आलेख खाली येऊ लागला आहे. १७ सप्टेंबरपासून दररोज आढळून येणाऱ्या रुग्णांची संख्या सातत्याने घटत असून त्यापेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक नोंदली जात आहे. बुधवारीही प्राप्त अहवालात दिवसभरात १४६ रुग्ण आढळून आले, त्यामुळे एकूण रुग्णसंख्या ५१ हजार ४५० झाली, तर २३६ बरे झाल्यामुळे बरे झालेल्यांचा आकडा ४७ हजार ८६२वर पोचला. बुधवारी एरंडोल व बोदवड या दोन तालुक्यांत एकही नवीन रुग्ण आढळला नाही. जिल्ह्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या आता केवळ २३५५ राहिली आहे. मंगळवारी ‘झिरो डेथ डे’ नोंदला गेल्यानंतर बुधवारी गेल्या २४ तासांत तीन मृत्यू नोंदले गेले. 

असे आढळले रुग्ण 
जळगाव शहर ४२, जळगाव ग्रामीण ३, भुसावळ ४१, अमळनेर ९, चोपडा ७, पाचोरा ८, भडगाव ४, धरणगाव ३, यावल ३, जामनेर ५, चाळीसगाव १२, मुक्ताईनगर ३, अन्य जिल्ह्यातील ४. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Nandurbar bribery case
Jalgaon Engineer Incident
Jalgaon Mother and Son Case
Girna Dam Water Storage
Marathi News Esakal
www.esakal.com