
वृद्धेचा शोध घेत होती. महिलेचा सर्वत्र शोध सुरू होता. आज तब्बल आठ दिवसांनंतर हॉस्पीटलच्या कोरोना सेंटरच्या सात नंबरच्या वॉर्डमधील बाथरूममधून दुर्गंधी
येवू लागली.
जळगाव ः कोरोना आजारावरील रुग्णांच्या बाबत जळगाव वैद्यकीय महाविद्यालयाचा सिव्हील रुग्णालयात भोंगळ कारभार पुन्हा उघड झाला आला आहे. भुसावळ येथील कोरोनाबाधित 82 वर्षीय वृद्ध महिला 2 जून पासून रुग्णालयातून बेपत्ता होती. परंतू आठ दिवसानंतर आज तिचा वैद्यकीय महाविद्यालयाच्या हॉस्पिटल बाथरूममध्ये मृतावस्थेत आढळून आला. त्यामुळे जळगाव जिल्ह्यात या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
जिल्हा वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय हे "कोविड' सेंटर म्हणून आहे. या रुग्णालयात कोरोना बाधितांचे उपचार केला जात असून मुळ न्हावी गावाची सद्या स्थित भुसावळ शहरातील 82 वर्षीय
कोरोना पॉझिटिव्ह वृद्ध महिला 1 जूनला उपचारासाठी दाखल केले होते. दुसऱ्या दिवशी 2 जूनपासून ही वृध्द महिला रुग्णालयातून हरवली होती. याबाबत जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात हरविल्याची नोंद केली होती. गेल्या आठ दिवसापासून या महिलेचा सर्वत्र शोध घेतला जात होता. मात्र आज हॉस्पिटलच्या 7 नंबर वॉर्डमधील बाथरूममध्ये महिलेचा मृतदेह आढळून आला.
तब्बल आठ दिवस बाथरूममध्ये मृतदेह
दोन जूनला महिला हरविल्यानंतर कोविड रुग्णालयातून बेपत्ता झाली. या घटनेनंतर यंत्रणा आरोग्य तसेच पोलिस यंत्रणा खडबडून जागी होवून या वृद्धेचा शोध घेत होती. महिलेचा सर्वत्र शोध सुरू होता. आज
तब्बल आठ दिवसांनंतर हॉस्पीटलच्या कोरोना सेंटरच्या सात नंबरच्या वॉर्डमधील बाथरूममधून दुर्गंधी
येवू लागली. हॉस्पीटलच्या कर्मचाऱ्यांनी बाथरुम तपासले असता ही महिला मृतावस्थेत आढळून आली.
सिव्हीलच्या यंत्रणेवर प्रश्नचिन्ह
कोरोना बाधित महिला रुग्णालयातून गायब होते कशी, तब्बल 8 दिवस रुग्णालयाच्या बाथरूममध्ये या बेपत्ता महिलेचा मृतदेह सापडतो कसा. आठ दिवसात कोणीच या बाथरूम मध्ये गेले नाही का ? असे अनेक प्रश्नचिन्ह आता सिव्हिल हॉस्पिटलच्या यंत्रणेवर निर्माण झाले आहे.