esakal | केंद्राच्या पथकाने सिरो सर्व्हे’अंतर्गत ४०० जणांचे घेतले सॅम्पल 
sakal

बोलून बातमी शोधा

केंद्राच्या पथकाने सिरो सर्व्हे’अंतर्गत ४०० जणांचे घेतले सॅम्पल 

कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. मात्र, सर्वसामान्य व्यक्तींमध्ये कोरोनाची लागण कितपत झाली आहे, हे जाणून घेण्यासाठी ‘सिरो सर्व्हे’ करण्यात येतो.

केंद्राच्या पथकाने सिरो सर्व्हे’अंतर्गत ४०० जणांचे घेतले सॅम्पल 

sakal_logo
By
देविदास वाणी

जळगाव  : जिल्ह्यातील नागरिकांमध्ये कोरोना ॲन्टिबॉडी तयार झाल्या किंवा नाही, याच्या तपासणीसाठी केंद्राचे पथक मंगळवारी (ता. २५) दाखल झाले. या पथकाने जिल्ह्यातील विविध गावांना भेटी देऊन ४०० जणांचे सॅम्पल घेतले. या सॅम्पलची तपासणी चेन्नई, नवी दिल्ली येथील संस्थांमध्ये होणार आहे. सॅम्पल घेतलेल्या नागरिकांमध्ये ॲन्टिबॉडीचे प्रमाण किती याची माहिती सॅम्पलचा अहवाल आल्यानंतर कळणार आहे. त्यासाठी किमान १० ते १५ दिवस लागतील, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली. 


केंद्रीय पथकाने मंगळवारी सकाळपासून विविध ठिकाणी ‘सिरो सर्व्हे’ केला. त्यात वॉर्ड ५७ (जळगाव महापालिका), वॉर्ड २८ (चाळीसगाव), वॉर्ड ४ (भुसावळ), मोहराळे (ता. यावल), तांदलवाडी (ता. रावेर), कडगाव (जळगाव), धरणगाव, वरखेडे (ता. भडगाव), नाईकनगर (ता. पाचोरा), गोराडखेडा (ता. जामनेर) या ठिकाणच्या नागरिकांच्या रक्ताचे नमुने (सॅम्पल) घेतले आहेत. पथकाबरोबर जिल्हा रुग्णालयातील एक डॉक्टर, एक लॅब टेक्निशियन, सहाय्यक आरोग्यसेविका होती. पथकात निरीक्षक म्हणून डॉ. तासखेडकर, डाॅ. मोरे, डॉ. तडवी होते. पथकाला पीपीई किट, तपासणीचे साहित्य दिले आहे. नोडल अधिकारी म्हणून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण आहेत. एकूण दहा पथके सॅम्पल घेण्यासाठी सायंकाळी उशिराने परतली आहेत. 

‘कोरोना’च्या टक्केवारीसाठी सर्व्हे 
कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. मात्र, सर्वसामान्य व्यक्तींमध्ये कोरोनाची लागण कितपत झाली आहे, हे जाणून घेण्यासाठी ‘सिरो सर्व्हे’ करण्यात येतो. व्यक्तीच्या रक्तद्रवामधील ॲन्टिबॉडीचा शोध याद्वारे घेतला जात आहे.  

संपादन- भूषण श्रीखंडे

loading image
go to top