esakal | जळगाव जिल्ह्यात कोरोना बाधित बळींची संख्या सातशेच्या टप्प्यात 
sakal

बोलून बातमी शोधा

जळगाव जिल्ह्यात कोरोना बाधित बळींची संख्या सातशेच्या टप्प्यात 

जळगाव ग्रामीण भागात कोरोनाचा उद्रेक सुरूच आहे. दिवसभरात नवे ७२ रुग्ण सापडल्याने जळगाव ग्रामीणमधील एकूण रुग्णसंख्या हजाराचा आकडा पार करून एक हजार ६५ झाली आहे.

जळगाव जिल्ह्यात कोरोना बाधित बळींची संख्या सातशेच्या टप्प्यात 

sakal_logo
By
सचिन जोशी

जळगाव ः जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा वेग वाढतच आहे. बुधवारी दिवसभरात प्राप्त अहवालांनुसार नव्याने ६०५ रुग्ण बाधित आढळून आले. एका दिवसातील बाधितांची ही विक्रमी संख्या आहे. तर दिवसभरात ३५१ रुग्ण बरे झाले. गेल्या २४ तासांत दहा जणांचा मृत्यू झाला, त्यामुळे बळींची संख्या ६८८ वर पोचली आहे. 


जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच आहे. जळगाव, चोपडा, अमळनेर, चाळीसगावसह एरंडोलही ‘हॉटस्पॉट’ बनले आहे. दिवसभरात ६०५ रुग्ण आढळल्यानंतर एकूण रुग्णसंख्या १९ हजार ६८७ झाली आहे. तर बरे झालेल्यांचा आकडाही १३ हजार ५२७ झाला आहे. 

...असे आढळले रुग्ण 
जळगाव शहर- ९०, जळगाव ग्रामीण- ७२, भुसावळ- १८, अमळनेर- १२, चोपडा- ९३, पाचोरा- नऊ, भडगाव- ६१, धरणगाव- १७, यावल- दहा, एरंडोल- ८२, जामनेर- १७, रावेर- २०, पारोळा- सात, चाळीसगाव- ६७, मुक्ताईनगर- एक, बोदवड- १२, अन्य जिल्ह्यातील सात. 

जळगाव तालुक्यात उद्रेक 
जळगाव ग्रामीण भागात कोरोनाचा उद्रेक सुरूच आहे. दिवसभरात नवे ७२ रुग्ण सापडल्याने जळगाव ग्रामीणमधील एकूण रुग्णसंख्या हजाराचा आकडा पार करून एक हजार ६५ झाली आहे. दुसरीकडे एरंडोल, चोपडा, चाळीसगावात संसर्ग वाढतोच आहे. 

धरणगावला संसर्ग वाढला 
धरणगाव : तालुक्यातील कानाकोपऱ्यांतील गावांमध्ये कोरोना पोचलेला आहे. त्यामुळे तालुक्यात आता एकूण ९६० रुग्ण झालेले आहेत. यापैकी ७०० रुग्ण बरे झाले आहेत, तर २२३ उपचार घेत आहेत. यात १५१ ग्रामीण, तर ७२ शहरी भागातील रुग्ण आहेत. 

अमळगावात सहावा बळी 
अमळगाव (ता. अमळनेर) : अमळगावात कोरोनाचा कहर सुरूच असून, मंगळवारी कोरोनाचा सहावा बळी गेला. त्यामुळे गावात कोरोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या सहावर पोचली आहे. 

वैद्यकीय अधिकाऱ्याची मात 
पहूर (ता. जामनेर) : पहूर पेठ येथील चार जण, तर पहूर कसबे येथील एकजण, अशा एकूण पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर पहूर ग्रामीण रुग्णालयातील तीन वैद्यकीय अधिकारी बाधित झाले होते. त्यापैकी एक वैद्यकीय अधिकारी कोरोनावर यशस्वीरीत्या मात करून आपल्या घरी परतले आहेत. 

संपादन- भूषण श्रीखंडे
 

loading image
go to top