दिलासादायक : जळगाव जिल्ह्यात मृत्युदर प्रथमच तीन टक्क्यांखाली 

दिलासादायक : जळगाव जिल्ह्यात मृत्युदर प्रथमच तीन टक्क्यांखाली 
Updated on: 

जळगाव  : कोरोनाचा जळगाव जिल्ह्यातील विळखा आणखी घट्ट होत आहे. दिवसभरात नवे ६९६ बाधित आढळले असून, त्यामुळे एकूण रुग्णसंख्येने २७ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. दिवसभरात ५१५ रुग्ण बरे झाले असून, आठ जणांच्या मृत्युमुळे एकूण बळींचा आकडाही आठशेवर पोचला आहे. असे असले तरी जिल्ह्यात प्रथमच मृत्युदर तीन टक्क्यांखाली आला आहे. 

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढतच आहे. महिनाभरापासून रोज पाचशे ते सातशे रुग्णांची भर पडत आहे. रविवारी (ता.३०) प्राप्त अहवालानुसार दिवसभरात ६९६ रुग्ण वाढून एकूण आकडा २७ हजार १३५ झाला आहे, तर ५१५ रुग्ण बरे झाल्यानंतर बरे झालेल्यांची संख्याही १९ हजार २१३ झाली आहे. 

जळगाव, अमळनेरात उद्रेक 
जळगाव शहरासह अमळनेर तालुक्यात रुग्णवाढीचा उद्रेक सुरूच आहे. जळगाव शहरात २४ तासांत तब्बल १६९, तर अमळनेरला १४२ रुग्ण आढळले. अन्य ठिकाणी नवे बाधित असे : जळगाव ग्रामीण ५९, भुसावळ २६, चोपडा ७८, पाचोरा १२, भडगाव १२, धरणगाव २३, यावल ११, एरंडोल ५, जामनेर ३४, रावेर २७, पारोळा ५९, चाळीसगाव २७, मुक्ताईनगर ८, बोदवड ३. 

मृत्युदर घटल्याचा दिलासा 
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढून रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असताना त्या तुलनेत आता बरे झालेल्यांचे प्रमाण वाढू लागले असून, मृत्युदरही घटू लागला आहे. सुरवातीपासून आतापर्यंत सातत्याने मृत्युदर घटत असून, तो प्रथमच तीन टक्क्यांच्या खाली आला आहे. गेल्या आठवड्यात मृत्युदर ३.२२ टक्के होता, तो रविवारी घटून २.९७ टक्क्यांवर आला. 


वाढलेल्या चाचण्या, आढळून आलेल्या रुग्णांना तातडीने उपचारासाठी दाखल करणे, उपचारासाठी सज्ज आरोग्य यंत्रणा अशा सर्वांच्याच प्रयत्नांनी मृत्युदर घटत आहे. तो टप्प्याटप्प्याने कमी करून एक टक्क्यापेक्षा खाली आणण्याचे उद्दिष्ट आहे. 
- डॉ. जयप्रकाश रामानंद 
अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय 

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Nandurbar bribery case
Jalgaon Engineer Incident
Jalgaon Mother and Son Case
Girna Dam Water Storage
Marathi News Esakal
www.esakal.com