दिलासादायक जळगाव जिल्ह्यात ९१४ जण झाले कोरोनामुक्त‍ 

भूषण श्रीखंडे
Wednesday, 30 September 2020

गेल्या पंधरा दिवसांत रुग्ण बरे होण्याचा ‘रिकव्हरी रेट’ वाढला असून तो आता ८४. १५ टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे समाधानकारक चित्र सद्या दिसून येत आहे. 

जळगाव ः गेल्या चार महिन्यांपासून कोरोना व्हायरसचे जळगाव जिल्ह्यात संक्रमण प्रचंड वाढले होते. परंतु गेल्या पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात दिलासादायक चित्र निर्माण झाले असून, नवीन बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या वाढली आहे. आजही बांधितापेक्षा कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या मोठी असून, आज ९१४ जण कोरोनामुक्त होऊन आपल्या घरी गेले; तर नवीन बाधितांची संख्या २७३ संख्या होती. 

जिल्ह्यात कोरोना अतिशय झपाट्याने पसरला होता. त्यामुळे हजाराच्यावर बाधित दररोज निघत असल्याने आरोग्य विभाग, जिल्हा प्रशासन, महापालिका प्रशासनाची चांगलाच कस लागला होता. परंतु, सद्यःस्थितीत चित्र बदलले असून, बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. बुधवारी (ता. ३०) दिवसभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २७३ आढळली असून, ९१४ बरे होऊन घरी गेले आहेत. दिवसभरात नऊ जणांचा मृत्‍यू झाला. 

‘रिकव्हरी रेट’ वाढला 
जिल्ह्यात झपाट्याने वाढलेल्‍या आकड्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या पन्नास हजारीकडे वाटचाल करीत असली, तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. गेल्या पंधरा दिवसांत रुग्ण बरे होण्याचा ‘रिकव्हरी रेट’ वाढला असून तो आता ८४. १५ टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे समाधानकारक चित्र सद्या दिसून येत आहे. 

असे आढळले रुग्‍ण 
जळगाव शहर ९०, जळगाव ग्रामीण १३, भुसावळ ६५, अमळनेर ४, चोपडा १०, पाचोरा ६, भडगाव ७, धरणगाव ७, यावल ३, एरंडोल ११, जामनेर १९, रावेर ८, पारोळा ६, चाळीसगाव १६, मुक्ताईनगर ३, बोदवड १, इतर जिल्ह्यांतील ४ रुग्ण. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon corona Relief rate from corona disease is a comforting picture in Jalgaon district