esakal | अजून सहा महिने ’कोरोना के साथ’ 
sakal

बोलून बातमी शोधा

corona virus antigen test

रुग्ण लवकर दाखल करून त्याच्यावर लवकर उपचार करणे शक्य होत आहे. यामुळे बाधीतांचा मृत्यू दरही कमी झाला आहे. असे असताना नागरिकांनी स्वयंशिस्त पाळणे गरजेचे आहे. रुग्ण संख्या कमी होत असली तरी कोरोनोचा धोका अद्याप टळलेला नाही.

अजून सहा महिने ’कोरोना के साथ’ 

sakal_logo
By
देविदास वाणी


जळगाव : जिल्‍ह्यात कोरोना संसर्गाचे रुग्ण जरी कमी होत असले तरी ज्या भागात रुग्ण आढळून आला किंवा तो भाग हॉट्स्पॉट असल्‍याचे दिसून आले; तर त्या भागात नागरिकांच्या ॲन्टीजन चाचण्या वाढविण्याचे आदेश जिल्हा आरेाग्य यंत्रणेस राज्य स्तरावरून आले आहेत. तपासण्या करणे गरजेचे आहे, कारण किमान आणखी सहा महिने कोरोनासोबत जगायचे असल्‍याचे संकेत देण्यात येत आहेत. 
जिल्ह्यात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या ५१ हजार २१३ आतापर्यंत गेली आहे. असे असले तरी काही दिवसांपासून रुग्ण बाधीत होण्याचे प्रमाणे घटले आहे. मृत्यू दरही २.४० टक्क्यांपर्यत खाली आला आहे. असे असले तरी आरोग्य यंत्रणेने गाफील न राहता ॲन्टीजन चाचण्या सुरू ठेवण्याचे आदेश आहेत. 

२५ हजार किटचा पुरवठा
कोरोना रुग्ण पॉझीटीव्ह येण्याचा जळगाव जिल्ह्याचा दर राज्याच्या तुलनेत २२ टक्के आहे. तो दोन टक्क्यांपर्यंत नेण्यासाठी सर्वतोपरी उपाय योजना करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणेला देण्यात आले आहे. त्याच अनुषंगाने जिल्ह्याला २५ हजार ॲन्टीजन किटचा पुरवठा नुकताच झाला आहे. यामुळे ॲन्टीजन कीटची समस्या आता दुर झाली आहे. ॲन्टीजन कीट तालुकास्तरावर नेण्यासाठी दररोज वाहने जळगाव जिल्हा रुग्णालयात येत होते. नंतर ॲन्टीजन कीट घेऊन परत जावे लागत असे. यामुळे वेळ, पेट्रोल खर्चही वाढत असे. यावर उपाय म्हणून एकावेळी एक हजार अॅन्टीजन कीट घेऊन जा. किमान आठवडाभर ते पूरतील. अशा सूचना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एन.सी. चव्हाण यांनी तालुका यंत्रणेला दिल्या आहेत. 

अजून सहा महिने ’कोरोना के साथ’ 
माझे कुटूंब माझी जबाबदारी अभियानांतर्गत रुग्ण शोध मोहीम वेगात सुरू झाली. बाधीत रुणांना शोधण्यास मदत होत आहे. रुग्ण लवकर दाखल करून त्याच्यावर लवकर उपचार करणे शक्य होत आहे. यामुळे बाधीतांचा मृत्यू दरही कमी झाला आहे. असे असताना नागरिकांनी स्वयंशिस्त पाळणे गरजेचे आहे. रुग्ण संख्या कमी होत असली तरी कोरोनोचा धोका अद्याप टळलेला नाही. अजून सहा महिने तरी कोरोना के साथ घालवावे लागतील. यामुळे कोरोना संसर्गाला रेाखण्यासाठी नियमांचे पालन करणे गरजेचे असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.चव्हाण यांनी दिली. 

आकडे बोलतात.. 
आतापर्यत एकूण बाधीत --५१ हजार २१३ 
बरे होवून घरी गेलेले--४७ हजार ३९६ 
एकूण मृत्यू--१२३० 
उपचार घेत असलेले--२५८७ 
मृत्यूदर--२.४० टक्के 
रिकव्हरी दर--९२.५५ टक्के 

संपादन ः राजेश सोनवणे