गुलाबभाऊ आता हातात "रुमणे'च घ्या ! 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 31 मे 2020

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी विरोधात असताना सरकारला वठणीवर आणण्यासाठी "रुमणे'हाती घेतले होते. आता प्रशासनाला वठणीवर आणण्यासाठी रुमणेच हाती घेण्याची गरज आहे. अन्यथा या ढिसाळ कारभारामुळे जिल्ह्यातील जनतेला मोठा फटका बसण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 

जळगाव : "कोरोना'चे संकट जगात आहे, भारतातही आहे. मात्र जळगाव जिल्ह्यात त्याचे परिणाम जास्तच दिसून येत आहे. पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा तब्बल 667 च्या वर गेला आहे. तर तब्बल 68 मृत्युमुखी पडलेले आहे. उपचाराबाबतही अनागोंदी असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या सर्व बाबींना आता प्रशासनाची दिरंगाईच जबाबदार असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी विरोधात असताना सरकारला वठणीवर आणण्यासाठी "रुमणे'हाती घेतले होते. आता प्रशासनाला वठणीवर आणण्यासाठी रुमणेच हाती घेण्याची गरज आहे. अन्यथा या ढिसाळ कारभारामुळे जिल्ह्यातील जनतेला मोठा फटका बसण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 

क्‍लिक करा - कोरोना पॉझिटिव्ह...त्यात चालता येईना तरी कोविड सेंटरच्या गेटवर ती आली कशी
 

जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा विरोधात असताना एक दरारा दिसून येत होता. जिल्हा रुग्णालयात रुग्णांना चांगले उपचार मिळत नसतील थेट आंदोलन करून ते जाब विचारीत होते. जिल्हा प्रशासनाचा ढिसाळ कारभार विरोधात त्यांनी अनेक वेळा जिल्ह्यात रुमणे मोर्चे काढले आहे. प्रशासनातील अधिकाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी आपण हाती रुमणे घेतले आहे. असे जाहीर सभांमधून सांगत असत. त्यामुळे विरोधात असूनही प्रशासनातील अधिकारी त्यांना वचकून होते. 
गुलाबराव पाटील आज जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. "कोविड'विरुद्ध लढा देण्यासाठी ते स्वतः फिल्डवर काम करीत आहेत. बैठकाही घेत आहेत. मात्र त्यानंतर प्रशासनाच्या कामाची गती दिसून येत नाही. आजच्या स्थितीत जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या 676 होणे अत्यंत गंभीर बाब आहे. त्यात मृत्यूची संख्याही 68 पर्यंत गेली आहे. राज्यात मृत्यूचा दर जळगाव जिल्ह्याचा जास्त आहे. त्यामुळे प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा हा पुरावाच आहे. जळगाव जिल्ह्यात कोरोना बाधितांचा वाढणारा "ग्राफ' हा अत्यंत धोकादायक आहे. त्यामुळे आता प्रशासनाला गतीने आणि सक्रियपणे काम करण्याची गरज आहे. त्यादृष्टीनेच पालकमंत्र्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. 
पालकमंत्र्यांनी आपला शिवसेनेचा "बाणा' दाखविण्याची गरज आहे. आता प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन भागणार नाही, तर त्यांच्याकडून कामाचा अहवालही दररोज घेणे गरजेचे आहे. जळगाव जिल्हा कोविड सेंटरच्या बाबतीत तक्रारी आहेत. त्या ठिकाणी उपचाराबाबत फारसे लक्ष दिले जात नसल्याचे सांगण्यात येत आहे. तर रुग्णांचा मृत्यू झाला तर त्यानंतर त्याच्या अंत्यविधीच्या बाबतीत प्रशासन फारसे गंभीरतेने घेत नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे "कोरोना' रुग्णांच्या वाढीचा आलेख वाढतोय. महापालिकेच्या छत्रपती शाहू रुग्णालयात कोविड संशयितांना क्वारंटाइन करण्यात येते, मात्र त्या ठिकाणीही सुविधा नसल्याच्या तक्रारी आहेत. 

जबाबदारी कोणाची ? 
जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढतेय, मृत्यूचा दरही वाढतोय या परिस्थितीतील उत्तर देण्याची जबाबदारी कोणाची आहे. जिल्हा रुग्णालयातील अधिकारी त्याबाबत निष्क्रियपणे उत्तर देत आहेत. प्रशासनातील अधिकारी आम्ही काम करीत आहोत, हेच सांगत आहेत. मग जिल्ह्यातील परिस्थिती आटोक्‍यात का येत नाही, याचे उत्तर कोणीही देण्यास तयार नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon corona virus stop spread gulabrao patil strick action