कोरोनाचा विस्फोट कायम; जिल्ह्यात 138 पॉझिटीव्ह 

coronavirus
coronavirus
Updated on

जळगाव : जिल्ह्यात कोरोनाचा होत असलेला विस्फोट सातत्याने सुरू आहे. कोरोनाची लागण होत असलेल्या रूग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असून यात आज 138 नवीन रूग्ण आढळून आले आहेत. यामुळे जिल्ह्यातील बाधितांचा आकडा 3 हजार 720 वर पोहचला आहे. 
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. यात जिल्ह्यातील आकडा देखील वाढत असून वाढता प्रादुर्भाव रोखण्यात आरोग्य प्रशासनाची यंत्रणा हतबल झाली आहे. यामध्ये आज दिवसभरात आलेल्या एकूण 920 तपासणी अहवालांपैकी 636 जणांचे अहवाल निगेटीव्ह आले, तर 138 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. 
 
1 हजार 271 रूग्ण घेताय उपचार 
जिल्ह्यातील बाधितांचा आकडा रोज शंभर- दीडशेने वाढत आहे. यामुळे गेल्या पंधरा दिवसातच कोरोना बाधितांची संख्या दीड ते दोन हजाराच्या संख्येने वाढली आहे. आजच्या 138 नवीन बाधितांमुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ही 3 हजार 720 वर पोहचली आहे. यातील काही रूग्ण हे बरे होवून घरी परतले असून आजच्या स्थितीला 1 हजार 271 पॉझिटीव्ह रूग्ण हे उपचार घेत आहेत. 
 
आजही सहा जणांचा मृत्यू 
कोरोना बाधितांचा आकडा वाढत असताना कोरोनामुळे मृत्यू होण्याची संख्या देखील वाढत आहे. मंगळवारी जिल्ह्यात दहा जणांचा मृत्यू झाल्यानंतर आज आणखी सहा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यामुळे कोरोनामुळे मृत्यू झाल्यांची संख्या 250 झाली आहे. 

असे आढळले रूग्ण 
जळगाव शहर 39 (782), जळगाव ग्रामीण 6(125),भुसावळ 13 (432), अमळनेर 7 (326), चोपडा 11 (254), पाचोरा 1 (92), भडगाव 5 (233), धरणगाव 1 (159), यावल 13 (197), एरंडोल 3 (158), जामनेर 3 (202), रावेर 10 (268), पारोळा 5 (228), चाळीसगाव 1 (45), मुक्‍ताईनगर 1 (40), बोदवड 19 (79).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Jalgaon Engineer Incident
Jalgaon Mother and Son Case
Girna Dam Water Storage
Ganesh Idol Broken News
Marathi News Esakal
www.esakal.com