चिंताजनक...कोरोना संसर्ग सहा हजाराच्‍या टप्‍प्‍यावर!

राजेश सोनवणे
रविवार, 12 जुलै 2020

जळगाव जिल्ह्यातील कोरोना व्‍हायरसचा संसर्ग चांगलाच पसरत आहे. रोजच्‍या वाढ होत असलेल्‍या संख्‍येने प्रशासनाची देखील चिंता वाढली आहे. कोरोना वाढता संसर्ग आटोक्‍यात येत नसताना आज दिवसभरात नव्याने 238 कोरोनाबाधित रूग्ण आढळुन आले आहेत.

जळगाव : कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने प्रशासनासह जिल्‍हा वासियांच्‍या चिंतेत आता वाढ होवू लागली आहे. आज दिवसभरात २३८ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये सर्वाधिक जळगाव शहर भागातील असून मुक्‍ताईनगरमध्‍ये देखील संख्‍येत वाढ होत आहे. 

जळगाव जिल्ह्यातील कोरोना व्‍हायरसचा संसर्ग चांगलाच पसरत आहे. रोजच्‍या वाढ होत असलेल्‍या संख्‍येने प्रशासनाची देखील चिंता वाढली आहे. कोरोना वाढता संसर्ग आटोक्‍यात येत नसताना आज दिवसभरात नव्याने 238 कोरोनाबाधित रूग्ण आढळुन आले आहेत. यामुळे एकूण कोरोनाबाधीतांची संख्या 5 हजार 962 झाली आहे. यात जळगाव शहरात सर्वाधिक 83 रुग्णांचा समावेश आहे. 

दिवसभरात आठ कोरोनाबाधीतांचा मृत्यू
कोरोना पॉझिटीव्‍ह असलेल्‍यांवर कोविड रूग्णालयात उपचार सुरू आहेत. आजच्‍या स्‍थीतीला जिल्‍ह्यात २ हजार ९१ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. यातील २०१ रूग्णांची प्रकृती चिंताजनक असून दिवसभरात आठ कोरोना बाधितांचा मृत्‍यू झाला. यात यावल, चोपडा तालुक्यातील प्रत्येकी 2 तर भुसावळ चाळीसगाव रावेर, आणि एरंडोल येथील प्रत्येकी एका रूग्णाचा समावेश आहे. आज अखेरपर्यंत कोरोनामुळे मृत्‍यू झालेल्‍यांची संख्‍या ३२९ वर पोहचली आहे.

जिल्‍ह्यात असे आढळले रूग्ण
जिल्ह्यात आढळलेल्या रूग्णांमध्ये जळगाव शहर 83 , जळगाव ग्रामीण 7, भुसावळ 6, अमळनेर 6, चोपडा 32, भडगाव 8, धरणगाव 15, यावल 10, एरंडोल 4, जामनेर 12, रावेर 13, पारोळा 2 , चाळीसगाव 9, मुक्ताईनगर 31, याप्रमाणे रुग्णांचा समावेश आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon corona virus update today positive cases