कोरोना योद्धा आता लोकप्रतिनिधींच्या घरासमोर करणार घंटानाद

संविधान जागर समितीचे संयोजक भारत ससाणे यांनी न्याय मिळविण्याचा मार्ग आंदोलनातूनच जातो.
corona
corona
Updated on

जळगाव ः स्वतःचा जीव धोक्यात घालून रुग्णांची सेवा करणाऱ्या कोरोना योद्धयांना (Corona Warriors) शासकीय सेवेत (Government service) सामावून घेण्याच्या मागण्यासाठी महाराष्ट्र जनक्रांती मोर्चातर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आलेल्या ठिय्या आंदोलन (Movement) करण्यात आले. जर मागणी पुर्ण न झाल्यास याढे लोकप्रतिनिधींच्या घरासमोर घंटानाद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.

corona
भुसावळ जंक्शनला ‘हायटेक’ रेल्वेस्थानकाचे स्वरूप

कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची सेवा करण्यासाठी जीवाच्या भीतीपोटी कोणीही पुढे येत नसताना कंत्राटी स्वरूपात काम करणारे डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्डबॉय, आया, डाटा एंट्री ऑपरेटर, सुरक्षारक्षक, सफाई कामगार यांच्या समर्पित त्यामुळे नागरिकांचा जीव वाचला आहे.या कोरोना योद्धयांना शासकीय सेवेत सामावून घेण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाने राष्ट्रव्यापी आंदोलन पुकारले आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणांच्या निनादात ठिय्या आंदोलन करण्यात आले.


प्रदेशाध्यक्ष मुकुंद सपकाळे यांनी कोरोना योद्धयांना त्यांचा हक्क व अधिकार मिळवून देण्यासाठी लोकप्रतिनिधींच्या घरासमोर घंटानाद आंदोलन करण्याचा इशारा दिला. संविधान जागर समितीचे संयोजक भारत ससाणे यांनी न्याय मिळविण्याचा मार्ग आंदोलनातूनच जातो असे सांगून कोरोना विरुद्धच्या लढ्यात सेवा देणारे योद्धा यांची एकजूट शासनाला दखल घेण्यास भाग पाडेल असे सांगितले.

corona
पात्र लाभार्थ्यांना त्वरीत रेशननकार्ड द्या-मंत्री छगन भुजबळ

निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. निलेश बोरा, रमेश सोनवणे, प्रा.प्रीतीलाल पवार, दिलीप सपकाळे, एच.एच. चव्हाण, युवराज सुरवाडे, कुंदन माळी,प्रतीक्षा सोनवणे, दिपाली भालेराव, सोना सुरवाडे, शिला सपकाळे, मंदाकिनी विंचुरकर, ललिता पवार, ऐश्वर्या सपकाळे, पूनम जाधव, यशोदा कार्लेकर, टिना बिऱ्हाडे, भाग्यश्री चौधरी, जगदीश सपकाळे आदींनी आंदोलनात सहभाग घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Shahada Bribery Case
Amarpani Mahadev Temple Incident Goes Viral in Nandurbar
Fake RPF Woman
What is the Jalgaon ACB bribery case in Parola?
Marathi News Esakal
www.esakal.com