गणेशोत्सवावर ‘कोरोना’चे सावट...चार फुटापेक्षा कमी उंचीच्या मुर्तीला प्राधान्य 

देविदास वाणी
Wednesday, 29 July 2020

जळगाव जिल्हयातही मुर्ती घडविणाऱ्या कारागिरांनी मुर्ती घडवून त्यावर अंतीम रंगीत देण्यास सुरवात केली आहे. मुर्ती घडविण्यासाठी लागणारे प्लास्टर ऑफ परिस, नारळाची कुट्टी मद्रास येथून आणली जाते.

जळगाव ः अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेला गणेशोत्सव पुढील महिन्यात आहे. गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या गणेश मुर्ती बनविण्यासाठी कारागिरांची लगबग सुरू झाली आहे. कोरोनामुळ यंदा सोशल डिस्टनचे पालन करीत मुर्ती घडविल्या जात आहेत. मुर्तीच्या उंचीवर बंधन असल्याने चार फुटापयर्तच मुतीर् बनविल्या जात आहेत. यंदा प्लस्टर ऑफ पॅरिस, नारळाची कुट्टी आदी वस्तू महाग झाल्या आहेत. यामुळे मुर्तीचा दरही वाढणार आहे. 

‘कोराना’मुळे राज्यभरात गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे मुख्यमंत्र्यांनी आवाहन केले आहे. मुंबई, पुण्यातील अनेक गणेश मंडळांनी त्याला प्रतिसाद देत मोठ्या उंच मुतीर् न बसविणे, गर्दी होणार नाही याची दक्षता घेण्याची हमी दिली आहे. 
जळगाव जिल्हयातही मुर्ती घडविणाऱ्या कारागिरांनी मुर्ती घडवून त्यावर अंतीम रंगीत देण्यास सुरवात केली आहे. मुर्ती घडविण्यासाठी लागणारे प्लास्टर ऑफ परिस, नारळाची कुट्टी मद्रास येथून आणली जाते. कोरोनामुळे वाहतूकीचा खर्च दुप्पट झाला आहे. यामुळे या वस्तूंचे दरही वाढले आहे. 

यंदा मुर्ती घडविण्यावर बंधन असल्याने लहान मुर्ती अधिक संख्येने घडविण्यावर भर आहे. मोठ्या मुर्ती केवळ चार फुट उंचीपर्यंत बनवित आहे. लहान मुती बनवून तयार आहे. मोठया मुती आता घडवायला घेतल्या आहेत. गणेशोत्वापर्यंत मुर्ती तयार होतील. मुर्तीच्या बुकींगला सुरवात झाली आहे. मात्र हवा तसा प्रतिसाद अजून मिळाला नाही. 
असे मेहरूण परिसरातील मुर्तीकार योगेश कुंभार यांनी सांगितले. 

दर अतिशय कमी करू नये 
दरवर्षी मोठ्या मुर्ती तीन हजारावर तयार करीत होतो. आता त्या एक हजार बनविणार आहे. लहान मुर्ती पाच हजार बनवितो यंदा अडीच हजार मुतीर् बनविणार आहे. काेरोनामुळे सहा महिन्यापासून व्यवसाय ठप्प होता.उन्हाळ्यात माठ, रांजणही कमी संख्येने विकले गेले. आता मुतीही कमी विकल्या जातील. ग्राहकांनी मुर्ती घेताना भाव अतिशय कमी करू नये. कुंभार बांधवांनाही कष्ट करावे लागतात याची जाणीव ठेवावी असे श्री.कुंभार यांनी सांगितले. 
 

 संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Corona's effect on Ganeshotsav Preference is given to idols less than four feet high