esakal | रूग्‍ण घटले तरी ॲन्टिजेन किटचा तुटवडा; संपर्कातील व्यक्तींच्या टेस्टिंग नाहीच 
sakal

बोलून बातमी शोधा

coronavirus antigen test

रुग्ण पॉझिटिव्ह येत आहेत ते स्वतःहून आरोग्य यंत्रणेकडे येताहेत. आरोग्य यंत्रणेने तपासण्याच कमी केल्या तर रुग्णसंख्या आपोआप कमी होईल, असा दावा केला जात आहे. 

रूग्‍ण घटले तरी ॲन्टिजेन किटचा तुटवडा; संपर्कातील व्यक्तींच्या टेस्टिंग नाहीच 

sakal_logo
By
देविदास वाणी

जळगाव : कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याचे चित्र शहरासह जिल्ह्यात दिसत आहे. वास्तविक पाहता कोरोना टेस्टिंगसाठी लागणारे ॲन्टिजेन किटच शिल्लक नाही. पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तीची तपासणी होत नसल्याने रुग्ण संख्या कमी दिसत असल्याचे एका माहितीतून उघड होत आहे. 
गेल्या एक-दीड महिन्यापासून शहरासह जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्येत घट होत आहे. ही घट समाधानकारक असली तरी, जे रुग्ण पॉझिटिव्ह येत आहेत ते स्वतःहून आरोग्य यंत्रणेकडे येताहेत. आरोग्य यंत्रणेने तपासण्याच कमी केल्या तर रुग्णसंख्या आपोआप कमी होईल, असा दावा केला जात आहे. 
जिल्ह्यात ११ ते २५ ऑक्टोबरदरम्यान ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ योजनेचा दुसरा टप्पा झाला. त्यात घरोघर जाऊन सर्वांचीच आरोग्य तपासणी झाली. नंतर मात्र ‘ट्रीपल टी’ योजना बारगळली असल्याचे जाणवते. तपासण्या थांबविल्याने रुग्णसंख्या कमी होत आहे. ज्या रुग्णांना त्रास होतो तेच रुग्ण तपासणीसाठी पुढे येत आहेत. जे पॉझिटिव्ह रुग्ण आहेत त्यांच्या संपर्कातील व्यक्तीचा शोध घेऊन त्यांच्यावर उपचार करणे, त्यांचे घर सॅनिटाइज करणे अशी कामेही बंद झाली आहेत. 
 
दररोज अडीच ते तीन हजार कोरोना टेस्टिंग सुरू आहे. टेस्टिंग बंद केलेल्या नाहीत. तपासणीत रुग्ण कमी आढळत आहेत. संपर्कातील व्यक्तीची तपासणी, घर सॅनिटरायझेशन करणे ही महापालिकेची जबाबदारी आहे. ॲन्टिजेन किटही २५ हजार उपलब्ध आहेत. 
-डॉ. एन. सी. चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक, जळगाव 

संपादन ः राजेश सोनवणे