चाचण्यांच्या तुलनेत बाधितांचे प्रमाण केवळ दीड टक्‍का

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 12 November 2020

जळगाव जिल्ह्यात नोव्हेंबरमध्येही सातत्याने कोरोना रुग्णांची संख्या घटत आहे. गुरुवारी जवळपास अडीच हजारांवर अहवाल प्राप्त झाले. त्यात केवळ ३० रुग्ण आढळून आले.

जळगाव : जिल्ह्यातील कोरोना संसर्गात गुरुवारीही नव्या बाधितांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक होती. प्राप्त अहवालात ३० नवे बाधित आढळून आले, तर ६७ रुग्ण बरे होऊन घरी गेले. गेल्या २४ तासांत एका रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला. 
जळगाव जिल्ह्यात नोव्हेंबरमध्येही सातत्याने कोरोना रुग्णांची संख्या घटत आहे. गुरुवारी जवळपास अडीच हजारांवर अहवाल प्राप्त झाले. त्यात केवळ ३० रुग्ण आढळून आले. चाचण्यांच्या तुलनेत रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण आता १.५ टक्केच राहिले आहे. आजअखेर एकूण रुग्णसंख्या ५३ हजार ६९७ वर पोचली आहे. तर दिवसभरातील ६७ रुग्ण बरे झाल्याने बरे झालेल्यांचा आकडा ५१ हजार ९८१ एवढा आहे. आजच्या एका मृत्यूसह एकूण बळींची संख्या १२७४ झाली असून मृत्यूदर २.३८ टक्क्यांवर कायम आहे. 

जळगावला दिलासा 
जळगाव शहराला गुरुवारी दिलासा मिळाला. शहरात केवळ ३ रुग्ण आढळून आले. सध्या शहरात अवघे १६० ॲक्टिव रुग्ण आहेत. आज अमळनेरला ३, जळगाव ग्रामीणमध्ये १, धरणगावला १, यावल येथे २, जामनेरला १४, बोदवडला ५ असे रुग्ण आढळले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon coronavirus new patient ratio low