
जिल्ह्यात कोरोना व्हायरस महिना दीड महिना अगदी गतीने पसरला आणि आकडा वाढला. मार्केट खुले झाल्याने आकडा झपाट्याने वाढत राहिला. परंतु, सध्या स्थितीला चित्र बदलले असून, बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.
जळगाव : कोरोना व्हायरसचे संक्रमण वाढत असताना आठवडाभरापासून जिल्ह्यात दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे. आठवडाभरापुर्वी बाधित आणि बरे होणारे यांच्या दुप्पट आकड्यांची तफावत होती. ते चित्र आता उलटे झाले असून कोरोना बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचा आकडा चारपटीने अधिक आला आहे.
जिल्ह्यात कोरोना व्हायरस महिना दीड महिना अगदी गतीने पसरला आणि आकडा वाढला. मार्केट खुले झाल्याने आकडा झपाट्याने वाढत राहिला. परंतु, सध्या स्थितीला चित्र बदलले असून, बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. आज (ता. २९) दिवसभरात करोना बाधित रुग्णांची संख्या २६१ आढळली असुन ८७८ बरे होवून घरी गेले आहेत. तर दिवसभरात ९ जणांचा मृत्यू झाला.
४८ हजाराच्या उंबरठ्यावर
जिल्ह्यात झपाट्याने वाढलेल्या आकड्यामुळे कोरोना बाधितांची संख्या पन्नास हजारीकडे वाटचाल करत आहे. आजच्या नवीन २६१ रूग्णांमुळे जिल्ह्यातील एकुण कोरोना बाधित रुग्णांची संख्या ४८ हजार ९०७ झाली आहे. त्यापैकी ३९ हजार ६३१ रुग्णांनी कोरोनावर मात केली. मात्र कोरोनामुळे आतापर्यंत १ हजार १७५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्यास्थितीला ७ हजार १०१ रुग्ण उपचार घेत आहेत.
असे आढळले रूग्ण
जळगाव शहर १८, जळगाव ग्रामीण ४, भुसावळ २६, अमळनेर ३२, चोपडा १६, पाचोरा ९, भडगाव ७, धरणगाव १९, यावल ४, एरंडोल ३, जामनेर २१, रावेर २९, पारोळा ७, चाळीसगाव ३९, मुक्ताईनगर ११, बोदवड ४, इतर जिल्ह्यातील २ रूग्ण आहेत.