कोरोना रिकव्हरी दर सुधारला; मृत्‍यूदर कमी होईना

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 17 October 2020

जळगाव जिल्‍ह्‍यातील कोरोनाचा वाढता आलेख खाली येण्यास सुरवात झाली आहे. दोन आठवड्यांपासून कोरोनाची बाधा झालेल्‍या रूग्‍णांची संख्या कमी आणि बरे होवून घरी जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे.

जळगाव : सलग दोन आठवड्यांपासून कोरोनाच्या वाढत्‍या रूग्‍णांमध्ये दिलासा मिळाला आहे. परिणामी जिल्‍ह्‍यातील रिकव्हरी दर सुधारला असून, ९३ टक्‍क्‍यांच्यावर पोहचला आहे. एकीकडे हा दिलासा असला तरी मृत्‍यूदर अजून देखील खाली येत नसल्‍याचे चित्र आहे.
जळगाव जिल्‍ह्‍यातील कोरोनाचा वाढता आलेख खाली येण्यास सुरवात झाली आहे. दोन आठवड्यांपासून कोरोनाची बाधा झालेल्‍या रूग्‍णांची संख्या कमी आणि बरे होवून घरी जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. जिल्‍हा वासीयांसाठी हे दिलासादायक चित्र असले तरी कोरोनाची भिती अद्याप पुर्णपणे संपलेली नाही. यामुळे नागरीकांची सावध राहणेच महत्‍त्‍वाचे ठरणार आहे. कारण, हिवाळ्यात कोरोनाचा संसर्ग आणखी वाढण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. 

बरे होणाऱ्यांचाच आकडा अधिक
जिल्‍ह्‍यात दिलासादायक चित्र निर्माण झाले असून, बरे होणाऱ्यांचा आकडा वाढत चालला आहे. हा आकडा सातत्‍याने वाढत असल्‍याने प्रत्‍यक्ष उपचार घेत असलेल्‍या रूग्‍णांची संख्या ही २ हजार १८ वर आहे. यात आज दिवसभरात कोरोनाची लागणी झालेल्‍यांची संख्या १३२ तर बरे होवून घरी जाणाऱ्यांची संख्या २१८ आहे. तर एका रूग्‍णाचा मृत्‍यू झाला आहे.

असे आढळले रूग्‍ण
जळगाव शहर ४७, जळगाव ग्रामीण ५, भुसावळ ३२, अमळनेर १, चोपडा ६, पाचोरा १, भडगाव १, धरणगाव २, यावल ६, जामनेर १८, रावेर ६, चाळीसगाव ४, मुक्‍ताईनगर १, बोदवड १, एरंडोल आणि पारोळा ० आणि इतर जिल्‍ह्‍यातील १ रूग्‍णाचा समावेश आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon coronavirus recovery rate up last two week