जिल्‍ह्‍याचा रिकव्हरी रेट एक टक्‍याने वाढला

सकाळ वृत्तसेवा
Monday, 28 September 2020

जळगाव जिल्‍ह्‍यातील कोरोना व्हायरसची लागण झालेल्‍यांची संख्या कमी निघू लागली आहे. आज (ता.२८) करोना बाधित रुग्णांची संख्या जिल्ह्यात ४९२ आढळली असून दिवसभरात बरे होणाऱ्यांची संख्या ६६० झाली आहे.

जळगाव : जिल्‍ह्‍यातील कोरोनाचा विस्‍फोट मंदावला आहे. यामुळे जिल्‍हा वासियांसाठी एक दिलासादायक चित्र निर्माण झाल्‍याचे पाहण्यास मिळत आहे. आठवडाभरापासून बरे होण्याचे प्रमाण अधिक राहिले असून, कालच्या तुलनेत जिल्‍ह्‍याचा रिकव्हरी रेटमध्ये एक टक्‍क्‍याने वाढ झाली आहे.  
जळगाव जिल्‍ह्‍यातील कोरोना व्हायरसची लागण झालेल्‍यांची संख्या कमी निघू लागली आहे. आज (ता.२८) करोना बाधित रुग्णांची संख्या जिल्ह्यात ४९२ आढळली असून दिवसभरात बरे होणाऱ्यांची संख्या ६६० झाली आहे. जिल्ह्यात आता एकुण कोरोना बाधित रुग्णांची संख्या ४७ हजार ६४६ झाली असून, त्यापैकी ३८ हजार ७५३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर सध्या स्‍थितीला ७ हजार ७२७ रुग्ण उपचार घेत आहेत. बरे होण्याची संख्यसा वाढल्‍याने जिल्ह्याचा रिकव्हरी रेट ८१.३४ टक्के इतका झाला आहे. तर दिवसभरात ४ रुग्णांचा मृत्यू झाला असून आजच्या स्‍थितीला जिल्‍ह्‍यातील मृत्युदर २.४५ टक्क्यांवर आहे. 

असे आढळले रूग्‍ण
जळगाव शहर १४७, जळगाव ग्रामीण २४, भुसावळ १६८, अमळनेर १४, चोपडा १२, पाचोरा १३ , भडगाव २, धरणगाव ३, यावल १०, एरंडोल ८, जामनेर ११, रावेर १४, पारोळा ६, चाळीसगाव ४१, मुक्ताईनगर १७, इतर जिल्ह्यातील १ आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon coronavirus recovery rate one percent high last day