esakal | corona update जळगाव जिल्ह्यात ५४० बाधित; २० हजारांचा टप्पा पार 
sakal

बोलून बातमी शोधा

coronavirus

जळगाव जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा आलेख वाढतच असून त्यात गेल्या पंधरा दिवसांत कुठलाही बदल झालेला नाही. दररोज पाचशेपेक्षा अधिक रुग्ण आढळून येण्याची मालिका आजही सुरुच होती.

corona update जळगाव जिल्ह्यात ५४० बाधित; २० हजारांचा टप्पा पार 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

जळगाव : कोरोना संसर्गित रुग्णांच्या एकूण संख्येने आज जळगाव जिल्ह्यात २० हजारांचा टप्पा पार केला. दिवसभरात नवे ५४० रुग्ण आढळून आले असून एकाच दिवसांत विक्रमी ४५० रुग्ण बरे झाल्याची दिलासादायक नोंदही झाली. मात्र, गेल्या २४ तासांत १२ रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे एकूण बळींची संख्या ७०० झाली आहे. 
जळगाव जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा आलेख वाढतच असून त्यात गेल्या पंधरा दिवसांत कुठलाही बदल झालेला नाही. दररोज पाचशेपेक्षा अधिक रुग्ण आढळून येण्याची मालिका आजही सुरुच होती. बुधवारी विक्रमी ६०५ रुग्ण आढळून आल्यानंतर गुरुवारीही ५४० रुग्णांची भर पडल्याने एकूण रुग्णसंख्या २० हजार २२७ झाली आहे. दिवसभरात बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येने विक्रमी ४५० आकडा गाठत एकूण बरे झालेल्यांची संख्याही १४ हजारांच्या टप्प्यात (१३ हजार ९७७) आहे. असे असले तरी आज १२ जणांचा मृत्यू झाला, त्यात ४० वर्षीय दोघा तरुणांचा समावेश असून एकूण बळींचा आकडा ७०० झाला आहे. आजच्या तीन मृत्यूंसह जळगाव शहरातील मृत्यूही १३७ झाले आहेत. 

असे आढळले रुग्ण 
पाचोरा, चाळीसगावात कोरोनाचा उद्रेक सुरु असून पाचोऱ्यात दिवसभरात ८० तर चाळीसगाव येथे ६९ रुग्ण आढळले. जळगाव शहर ७२, जळगाव ग्रामीण ९, भुसावळ ३९, अमळनेर ५३, चोपडा १८, भडगाव ४१, धरणगाव १०, यावल १, एरंडोल २९, जामनेर १९, रावेर १७, पारोळा ५९, मुक्ताईनगर १६, बोदवड ५, अन्य जिल्ह्यातील ३. 
 

loading image
go to top