कोरोनाचा आकडा घटताच; तरीही ३३१ नवे पॉझिटीव्ह 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 4 October 2020

जळगाव जिल्‍ह्‍यात कोरोना व्हायरसचे घटते प्रमाण दिलासा देणारे असले तरी बाधितांचा रोजचा आकडा तिनशेहून अधिक निघत आहे. हा आकडा आणखी वाढू नये; याची काळजी घेणे महत्‍त्‍वाचे राहणार आहे.

जळगाव : जिल्‍ह्‍यातील कोरोना बाधितांचा आकडा घटता आणि बरे होणाऱ्यांचा आकडा वाढणारा आहे. यामुळे जिल्‍ह्‍यात दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे. असे असले तरी कोरोनामुळे मृत्‍यू होणाऱ्यांचा आकडा मात्र चिंता वाढविणारा ठरत आहे. आज देखील जिल्‍ह्‍यात सहा जणांचा कोरोनामुळे मृत्‍यू झाला. 
जळगाव जिल्‍ह्‍यात कोरोना व्हायरसचे घटते प्रमाण दिलासा देणारे असले तरी बाधितांचा रोजचा आकडा तिनशेहून अधिक निघत आहे. हा आकडा आणखी वाढू नये; याची काळजी घेणे महत्‍त्‍वाचे राहणार आहे. आज दिवसभरात ३३१ नवे बाधित रूग्‍ण आढळून आल्‍याने एकूण बाधितांचा आकडा ४९ हजार ४३५ वर पोहचला आहे. हा आकडा पन्नास हजाराच्या उंबरठ्यावर येवून ठेपला आहे. 

६५३ झाले बरे 
बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण गेल्‍या तीन- चार दिवसात तिप्पट राहिले होते. आज मात्र ही तफावत कमी झाली असून बाधितांपेक्षा बरे झालेल्‍यांचे प्रमाण दुप्पट आहे. ३३१ नवे बाधित आले असून तुलनेत बरे होणाऱ्यांचा आकडा ६५३ होता. आजअखेरपर्यंत एकूण बरे होणाऱ्यांचा आकडा ४३ हजार ८०१ वर पोहचला आहे. तर सध्या स्‍थितीला ४ हजार ४३० रूग्‍ण प्रत्‍यक्षात असून ते उपचार घेत आहेत. 

असे आढळले रूग्‍ण 
जळगाव शहर ६८, जळगाव ग्रामीण ३, भुसावळ २४, अमळनेर ५, चोपडा १२, पाचोरा १३, भडगाव ६, धरणगाव २, एरंडोल १, जामनेर १०१, रावेर ८, पारोळा ३, चाळीसगाव ७३, मुक्‍ताईनगर ९, बोदवड २ आणि इतर जिल्‍ह्‍यातील १ रूग्‍णाचा समावेश आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon coronavirus update 331 new patient