आशादायक..जिल्हा कोविड रुग्णालयातील १७० बेड रिकामे

आशादायक..जिल्हा कोविड रुग्णालयातील १७० बेड रिकामे
jalgaon covid center
jalgaon covid centersakal

जळगाव : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील कोरोनाबाधितांची (Jalgaon civil hospital) संख्या कमी होऊ लागल्याने बेडही रिकामे होत आहेत. ही बाब जिल्ह्यासाठी आशादायी आहे. एकावेळी १७० बेड रिकामे झाल्याने (Covid center) सर्व वॉर्डात व परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. निर्जंतुकीकरणही करण्यात आले. (jalgaon-coronavirus-update-civil-covid-center-beds-empty)

jalgaon covid center
पन्नास वर्षीपूर्वीचे भूषण; शेतकरी पती-पत्नीचे शिल्प मोडकळीस

राज्य शासनाने कोरोना (Jalgaon corona update) महामारी आटोक्यात आणण्यासाठी कडक निर्बंध लावले आहेत. यामुळे जिल्हाभरात कोरोना महामारी आता कमी झाली आहे. त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातही सोमवारी सुमारे १८० खाटा रिक्त झाल्या आहेत. त्यामुळे सर्व वॉर्डात साफसफाई करण्यात आली. तसेच, परिसर निर्जंतुकीकरण करण्यात आला. एसएमएस संस्थेचे सफाई व कंत्राटी कामगार, चतुर्थश्रेणी कर्मचारी आणि सफाई कामगाऱ्यांनी यात सहभाग घेतला.

स्‍वच्‍छता अभियान

निर्जंतुकीकरण आणि साफसफाई करीत असताना एसएमएस कंत्राटी कर्मचाऱ्यांचे निरीक्षक अजय जाधव, चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी मंगेश बोरसे, सफाई कामगारांचे प्रतिनिधी जितेंद्र करोसिया यांनी कर्मचाऱ्यांना सूचना करून स्वच्छता अभियानात सहभाग घेतला. स्वच्छतेसाठी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, उपअधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत देवरे, उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. संगीता गावित आदींनी मार्गदर्शन केले.

भुसावळ बनतेय हॉटस्पॉट

जळगाव जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात असला तरी भुसावळ तालुका आता हॉटस्पॉट बनत असल्याची स्थिती आहे. भुसावळ तालुक्यात गेल्या २४ तासांत तब्बल १५३ रुग्ण आढळून आले. तर यावल, पारोळा व एरंडोल तालुक्यात एकही रुग्ण समोर आला नाही. जळगाव शहरात अवघे १३ रुग्ण समोर आले. अन्य ठिकाणी असे आढळले रुग्ण : जळगाव ग्रामीण ३, अमळनेर १०, चोपडा ९, पाचोरा ८, भडगाव ६, धरणगाव १४, जामनेर ११, रावेर २०, चाळीसगाव २०, मुक्ताईनगर १७, बोदवड ११, अन्य जिल्ह्यातील ८

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com