जळगाव : जिल्ह्यातील रुग्णसंख्या मर्यादित असताना जळगाव शहरात मात्र कोरोनाचा संसर्ग वाढतच आहे. जिल्ह्यात सोमवारी (ता. ३०) आढळलेल्या ३६ नव्या बाधितांमध्ये जळगाव शहरातील १५ रुग्णांचा समावेश आहे. २४ तासांत दोघांचा मृत्यू झाला, तर ४८ रुग्ण बरे झाले.

जिल्ह्यात दिवाळीनंतर वाढत असलेला कोरोनाचा संसर्ग दोन दिवसांपासून पुन्हा घटत असल्याचे चित्र आहे. कालप्रमाणेच सोमवारीही नव्या बाधितांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक होती. सोमवारी प्राप्त अहवालात ३६ नवे रुग्ण समोर आले, त्यामुळे एकूण रुग्णसंख्या ५४ हजार ५६१ वर पोचली आहे. तर ४८ रुग्ण बरे झाल्याने बरे होणाऱ्यांचा आकडा ५२ हजार ७२५ झाला आहे. सध्या जिल्ह्यात ५३७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. २४ तासांत जळगाव व भुसावळ तालुक्यांतील प्रत्येकी एक वृद्ध अशा दोघांचा मृत्यू झाला. त्यामुळे बळींची संख्या तेराशेच्या टप्प्यात आहे.
जळगावात सर्वाधिक
जिल्ह्यातील अन्य शहर व तालुक्यांत मर्यादित रुग्ण आढळून येत असताना जळगाव शहरात मात्र रोज दोनअंकी संख्येतच रुग्ण आढळून येत आहेत. सोमवारीही शहरात १५ रुग्ण आढळून आले. भुसावळला ५, अमळनेरला ५, चोपडा, भडगाव, धरणगाव, रावेर, पारोळा या ठिकाणी प्रत्येकी १, पाचोरा, चाळीसगाव व बोदवड येथे प्रत्येकी २ रुग्ण आढळले.