कोरोनाचा आकडा घसरतोय; चाळीस जणांना बाधा

राजेश सोनवणे
Monday, 7 December 2020

जिल्हा प्रशासनाने पाठविलेल्या कोरोना अहवालात आज ४० रूग्ण कोरोना बाधित असल्याचे आढळून आले आहे. तर ६३ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

जळगाव : जिल्‍ह्‍यात नवीन कोरोना बाधितांचा आकडा येत असला तरी तुलनेत ही संख्या कमी येत आहे. हिवाळ्यात कोरोनाची दुसरी लाट येणार असल्‍याचे बोलले जात होते. परंतु, दिवाळीनंतर देखील अद्यापपर्यंत जिल्‍ह्‍यातील आकडा शंभरच्यावर पोहचला नाही. यामुळे जिल्‍ह्‍यासाठी दिलासादायक चित्र आहे. आज देखील ४० नवे बाधित रूग्‍ण आढळून आले आहेत.

जिल्हा प्रशासनाने पाठविलेल्या कोरोना अहवालात आज ४० रूग्ण कोरोना बाधित असल्याचे आढळून आले आहे. तर ६३ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मात्र सलग दुसऱ्या दिवशी एका देखील रूग्णाचा मृत्यू झालेला नाही. आज प्राप्त अहवालानुसार ४० नवीन बाधितांच्या आकड्यानंतर जिल्ह्यात एकुण ५४ हजार ८३८ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी ४५१ रूग्ण कोरोना रूग्णालयात उपचार घेत आहे तर ५३ हजार ८२ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 

असे आढळले रूग्‍ण
जळगाव शहर २२, जळगाव ग्रामीण १, भुसावळ २, चोपडा २, यावल २, जामनेर ३, चाळीसगाव ५, मुक्ताईनगर १, आणि इतर जिल्ह्यातील २ असे एकुण ४० रूग्ण बाधित आढळले आहे. तर अमळनेर, पाचोरा, भडगाव, धरणगाव, एरंडोल, रावेर, पारोळा, बोदवड तालुक्‍यांमध्ये एक देखील रूग्‍ण आढळून आला नाही.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon coronavirus update new patient retio down