esakal | जळगाव जिल्‍ह्‍यात कोरोनाचे दिलासादायक चित्र; बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढले
sakal

बोलून बातमी शोधा

coronavirus update

कोरोना व्हायरसने जिल्‍ह्‍यातच नव्हे तर राज्‍यात भितीदायक चित्र निर्माण केले आहे. पंधरा दिवसांपुर्वी जिल्‍ह्‍यातील चित्र पाहिले असता बाधितांचा आलेख उंचावला होता. रोज आठशे- नऊशेच्यावर रूग्‍ण आढळून येत होते. तुलनेत बरे होणाऱ्यांचे प्रमाण निम्‍म्‍यावर होते.

जळगाव जिल्‍ह्‍यात कोरोनाचे दिलासादायक चित्र; बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढले

sakal_logo
By
राजेश सोनवणे

जळगाव : गेल्‍या महिन्यात जिल्‍ह्‍यात कोरोनाचा होणारा विस्‍फोट आता काही प्रमाणात कमी झालेला आहे. अर्थात बाधित रूग्‍णांपेक्षा बरे होवून घरी जाणाऱ्या रूग्‍णांच्या संख्येत आठवडाभरापासून वाढ झाली आहे. यामुळे जिल्‍ह्‍यात कोरोनाचे एक दिलासादायक चित्र निर्माण झाल्‍याचे पाहण्यास मिळत आहे. असे असले तरी गाफील राहून चालणार नसून, नागरीकांनी काळजी घेणे हेच कोरोनाचे वाढते प्रमाण कमी करू शकणार आहे.
कोरोना व्हायरसने जिल्‍ह्‍यातच नव्हे तर राज्‍यात भितीदायक चित्र निर्माण केले आहे. पंधरा दिवसांपुर्वी जिल्‍ह्‍यातील चित्र पाहिले असता बाधितांचा आलेख उंचावला होता. रोज आठशे- नऊशेच्यावर रूग्‍ण आढळून येत होते. तुलनेत बरे होणाऱ्यांचे प्रमाण निम्‍म्‍यावर होते. परंतु सध्या स्‍थितीला हे चित्र बदलले आहे. तरी देखील पंधरा दिवसांपुर्वी होणाऱ्या विस्‍फोटामुळे जिल्‍ह्‍यातील एकूण बाधितांचा आकडा ४७ हजार १५४ झाला आहे. तर बरे होणाऱ्यांची एकूण संख्या ३८ हजार ९३ वर पोहचली आहे. यामुळे जिल्‍ह्‍यातील रिकव्हरी रेट हा ८०.७८ टक्‍के इतका झाला आहे. 

७ हजार ९०० ॲक्‍टिव्ह रूग्‍ण
कोरोना व्हायरसची लागण अनेकांना झाली असून, बाधितांची संख्या ५० हजाराच्या जवळ येवून पोहचली आहे. परंतु बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढत असल्‍याने प्रत्‍यक्षात उपचार घेत असलेल्‍या रूग्‍णांची संख्या तुलनेत कमी आहे. अर्थात सध्या स्‍थितीला जिल्‍ह्‍यात ७ हजार ८९९ रूग्‍ण कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. यात ६ हजार ५९८ रूग्‍णांमध्ये कोणत्‍याही प्रकारचे लक्षण नाही; तर १ हजार ३०५ लक्षण असलेले रूग्‍ण आहेत.

सात जणांचा मृत्‍यू
कोरोना संसर्ग झपाट्याने पसरत असल्‍याने भितीचे वातावरण असले तरी नागरीक अजूनही गांभिर्याने घेत नाही. यातच अनेकांना कोरोनाची लागण झाल्‍याचे लक्षात येत नसल्‍याने उपचार लवकर मिळत नाही. यामुळे मृत्‍यूचा आकडा देखील वाढत आहे. जिल्‍ह्‍यात आज दिवसभरात सात रूग्‍णांचा मृत्‍यू झाला असल्‍याने एकूण मृतांची संख्या १ हजार १६२ झाली आहे.

असे आढळले रूग्‍ण
जळगाव शहर ६२, जळगाव ग्रामीण ८, भुसावळ ५५, अमळनेर ३४, चोपडा ७०, पाचोरा २१, भडगाव ४, धरणगाव १९, यावल २८, एरंडोल २९, जामनेर १७, रावेर ९, चाळीसगाव ३२, पारोळा ७, मुक्ताईनगर १, बोदवड ७, अन्य जिल्ह्यातील ९.