esakal | ‘व्हर्टिकल गार्डन’साठीचा प्रोत्साहन निधी मिळाला; पण उदासीन मनपा तो खर्च करू नाही शकला 

बोलून बातमी शोधा

‘व्हर्टिकल गार्डन’साठीचा प्रोत्साहन निधी मिळाला; पण उदासीन मनपा तो खर्च करू नाही शकला }

वर्ष, दीड वर्षापूर्वी देण्यात आलेल्या निधीतून महापालिकेने ‘व्हर्टिकल गार्डन’ विकसित करण्याचे ठरवले.

‘व्हर्टिकल गार्डन’साठीचा प्रोत्साहन निधी मिळाला; पण उदासीन मनपा तो खर्च करू नाही शकला 
sakal_logo
By
सचिन जोशी

जळगाव : प्रदूषण नियंत्रणासाठी विविध प्रयोग करण्याच्या दृष्टीने महापालिकेला प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेला दहा लाखांचा निधीही महापालिकेने पूर्ण खर्च केलेला नाही. यातून केवळ तीन लाख खर्च करुन महापालिकेच्या इमारतीत व्हर्टिकल गार्डन उभारले असले तरी त्यातील रोपे मात्र पाण्याअभावी सुकत चालल्याचे विदारक चित्र दिसत आहे. 


महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ केवळ प्रदूषण नियंत्रणासंबंधी मॉनिटरिंग आणि प्रदूषण होत असलेल्या घटकांचा अभ्यास करत त्याबाबत संबंधित यंत्रणांवर कारवाईच करत नाही; तर स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून पालिका, महापालिकांना विविध पर्यावरणपूरक उपक्रमांसाठी प्रोत्साहनपर निधीही देते. 

मनपास दहा लाख 
याच पर्यावरणपूरक उपक्रमांतर्गत प्रदूषण नियंत्रण मंडळाने जळगाव मनपास दहा लाखांचा निधी दिला होता. साधारण वर्ष, दीड वर्षापूर्वी देण्यात आलेल्या निधीतून महापालिकेने ‘व्हर्टिकल गार्डन’ विकसित करण्याचे ठरवले. त्यानुसार महापालिकेच्या सतरा मजली प्रशासकीय इमारतीत काही मजल्यांवर या व्हर्टिकल गार्डन प्रकल्पात रोपवाटिका सज्ज करण्यात आल्या. महापालिकेच्या शाळा, दवाखाने आदी ठिकाणीही असे पर्यावरणपूरक प्रकल्प उभारणे या निधीअंतर्गत अपेक्षित आहे, पण मनपाने ते केलेले नाही. 


तीन लाखच खर्च 
परंतु, यावर केवळ साधारण तीन लाख रुपयेच खर्च झाले. उर्वरित ७ लाख रुपये अद्यापही अखर्चित आहे. याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून मनपास वारंवार निधी खर्चाच्या सूचना देण्यात आल्या. मात्र, तरीही हा निधी या व्हर्टिकल गार्डन अथवा त्यासंबंधी पर्यावरणपूरक प्रकल्पांवर खर्च झालेला नाही. 

रोपेही सुकली 
मनपा इमारतीत ज्या मजल्यांवर व्हर्टिकल गार्डनच्या वाटिका उभारल्या आहेत, त्यातील रोपेही आता पाण्याअभावी सुकली आहेत. या रोपांकडे लक्ष देणारे कुणी नाही, अशी स्थिती आहे. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे