esakal | जळगावकरांच्या तक्रारींचे घरबसल्या निरसन
sakal

बोलून बातमी शोधा

jalgaon corporation

जळगावकरांच्या तक्रारींचे घरबसल्या निरसन

sakal_logo
By
टिम इ सकाळ

जळगाव : महापालिकेच्या पुढाकारातून ‘महापौर सेवा कक्ष’ स्थापन झाला असून, तो जनतेसाठी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर (ता.१३) प्रत्यक्ष कार्यान्वित होणार आहे. महापौर जयश्री महाजन यांच्या दैनंदिन विविध कार्याची जनतेला माहिती व्हावी व हे कार्य जनतेपर्यंत तत्काळ पोहोचावे, या उद्देशातून सोशल मीडिया सेल सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे जळगावकरांना त्यांच्या समस्यांची उकल आता घरबसल्या करता येऊ शकेल.

महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते महापौर सेवा कक्षाचे उद्‌घाटन तसेच महापौरांच्या सोशल मीडिया सेलचा प्रारंभ करण्यात आला. मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी, उपमहापौर मा. कुलभूषण पाटील, माजी महापौर नितीन लढ्ढा व विष्णू भंगाळे, शिवसेनेचे महानगरप्रमुख शरद तायडे, गजानन मालपुरे, विरोधी पक्षनेते सुनील महाजन, नगरसेवक नितीन बरडे, अनंत (बंटी) जोशी, प्रशांत नाईक, ज्येष्ठ पत्रकार दिलीप तिवारी, सूत्रसंचालक गिरीश कुलकर्णी आदी उपस्थित होते.

या तक्रारींचे निराकरण

‘महापौर सेवा कक्षा’च्या माध्यमातून जनतेच्या स्वच्छता/प्रदूषण, पाणीपुरवठा, पथदिवे/लाईट, रस्ते, गटार/मलनिस्सारण, अतिक्रमण, विवाह नोंदणी, घरपट्टी/पाणीपट्टी, जन्म/मृत्यू नोंदणी, वैकुंठरथ/अ‍ॅम्ब्युलन्स, अग्निशामक, आपत्कालीन सेवा यासंदर्भातील समस्या/तक्रारींचे निराकरण झाले किंवा नाही याबाबतची माहिती फोनवरून मिळणार आहे.

loading image
go to top