गाळेधारकांवर आत्महत्या करण्याची वेळ 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 19 September 2020

गांधी मार्केटमधील गाळेधाकरांची बैठक आज दुपारी दोनला गांधी मार्केट असोसिएशनचे पंकज मोमाया यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी बैठकीत २०१४ पासूनचे थकीत भाड़े व करार नूतनीकरणाबाबत चर्चा झाली. तसेच मागील भाजप सरकारने महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ चे कलम ७९ मध्ये दुरुस्ती केली.

जळगाव : जळगाव येथील महापालिकेच्या मुदत संपलेल्या संकुलापैकी महात्मा गांधी मार्केटमधील गाळेधारक असोसिएशनची बैठक झाली. बैठकीत झालेल्या चर्चेत लोकप्रतिनीधींनी आम्हाला निवडणूकीपुर्ते आश्‍वासन दिले. परंतु, अजूनही गाळेधारकांचा प्रश्‍न भाजपचे नेते तसेच महापालिकेच्या पदाधिकाऱयांनी मार्गी लावलेला नाही. त्यामुळे शेतकर्यांप्रमाणे गाळेधारकांवर अवाजवी आलेल्या बिलामुळे आत्महत्या करण्याच वेळ आली आहे. त्यामुळे प्रशासाच्या विरोधात तिव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

गांधी मार्केटमधील गाळेधाकरांची बैठक आज दुपारी दोनला गांधी मार्केट असोसिएशनचे पंकज मोमाया यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी बैठकीत २०१४ पासूनचे थकीत भाड़े व करार नूतनीकरणाबाबत चर्चा झाली. तसेच मागील भाजप सरकारने महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ चे कलम ७९ मध्ये दुरुस्ती केली. परंतु, दुरुस्ती करताना जनहिताचा, भारतीय घटनेचा, कायद्याचा, महाराष्ट्रातील लहान स्वरूपातील व्यापारी गाळेधारकांचा, त्यांच्या व्यवसायाचा, त्यांच्या उत्पन्नाचा विचार न करता ही दुरुस्ती केली गेली. या बाबत बैठकीत तीव्र नाराजी गाळेधारकांनी व्यक्त केली. बैठकीस राकेश डारा, दिगंबर मेटकर, हितेश जैन, नितीन हेमनानी, बाबु हसिजा, अमोल वाणी, नरेन्द्र जैन, गोपाल बजाज, शंकर वाधवाणी उपस्थित होते. 

नेत्यांची केवळ आश्‍वासने 
जळगाव शहरातून निवडून आलेले भाजपचे आमदार यांनी आमदार म्हणून निवडून आल्यानंतर मनपाच्या ४ हजार ५०० गाळेधारकांच्या दुकानांना नियमानुसार मालकी हक्क मिळवून देण्याचा सन्मान प्राप्त करून देण्याचा वचननामाच जाहीर केला होता. परंतु, अजूनपर्यंत त्यांचे नेते व त्यांनी हा प्रश्‍न मार्गी लावलेला नाही. 

ऑनलाइन मार्केटमुळे फटका 
गेल्या सहा महिन्यांपासून कोरोनामुळे व्यवसाय ठप्प आहे. त्यात लहान-मोठ्या वस्तू या ऑनलाइन खरेदी केल्या जात असल्याने लहान व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर मोठा फरक पडला आहे. त्यामुळे अशा व्यवसायिकांकडे प्रशासाने लक्ष देवून भाडे, कर व शुल्कामध्ये काही सूट देणे आवश्‍यक असल्याची अपेक्षा गाळेधारकांनी व्यक्त केली. 

...तर तीव्र आंदोलन करू 
गाळेधारकांनी बैठकीत चर्चा केल्यानुसार लवकरच जळगाव मनपा मार्केट गाळेधारक संघटनेचे अध्यक्ष डॉ. शांताराम सोनवणे यांची भेट घेणार आहे. त्यांच्यासोबत चर्चेनंतर तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा बैठकीतून गाळेधारकांनी दिला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon corporation sankul Time to commit suicide on the cheekbones