खड्डे न बुजविताच दोन कोटीचे काढले बिले, चौकशीसाठी शिवसेनेने केले आंदोलन 

भूषण श्रीखंडे
Thursday, 27 August 2020

शिवसेनेच्या नगरसेवकांना समान निधी मिळत दिला जात नसून आम्हाला समान निधी मिळाला नाही तर यापुढे शिवसेना आणखी तीव्र आंदोलन करेल.

 जळगाव : जळगाव शहरात सर्वत्र बोंबाबोंब होत असून ८० टक्के रस्ते हे खड्डेमय झाले आहे. पावसाळ्यापूर्वी शहरातील खड्डे बुजविण्याच्या झालेल्या कामात सत्ताधारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी दोन कोटीचा गैरव्यवहार केला आहे. या भ्रष्टाचारी चौकशी करा याबाबत आज शिवसेनेच्या पदाधिकाऱयांनी आयुक्तांकडे ठिय्या आंदोलनाद्वारे मागणी केली. 

शहरातील खड्डे दुरुस्तीच्या कामात झालेल्या भ्रष्टाचार व प्रभागातील विकासासाठी निधी मिळत नसल्याबद्दल विरोधी शिवसेना नगरसेवकांनी आज महापालिकेच्या आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. यावेळी महापालिकेचे शिवसेनेचे विरोधी पक्षनेते सुनिल महाजन, शिवसेना महानगरप्रमुख शरद तायडे यांच्या नेतृत्वाखाली आज दुपारी आंदोलन करण्यात आले. यावेळी महापालिकेच्या प्रवेशद्वारा जवळ शिवसेनेकडून सत्ताधारी भ्रष्ट पदाधिकाऱयांविरोधात घोषणा दिल्या. तसेच आयुक्त सतीश कुळकर्णी यांच्या दालनात जावून तेथे ठिय्या आंदोलन केले. 

यावेळी शिवसेनेच्या पदाधिकऱयांनी शहरातील खड्डे बुजविण्यसाठी शासनाकडून मिळालेले दोन कोटी रूपये वापरण्यात आले. परंतू दोन कोटी खर्च केलेल्या रस्त्यावर पून्हा खडडे आले कसे. त्यामुळे यात मोठा भ्रष्टाचार झाला असून यात भाजपचे पदाधिकऱयांचा समावेश आहे. खड्डे न बुजविता बिले काढण्यात आली आहे असे आरोप विरोधीपक्षनेते श्री. महाजन यांनी केला. तसेच या सर्व प्रकरणाची चौकशी तातडीने करावी अशी मागणी आयुक्तांकडे यावेळी केली. तसेच शिवसेनेच्या नगरसेवकांना समान निधी मिळत दिला जात नसून आम्हाला समान निधी मिळाला नाही तर यापुढे शिवसेना आणखी तीव्र आंदोलन करेल असा ईशाराही श्री. महाजन यांनी दिला आहे. यावेळी नगरसेवक, प्रशांत नाईक, अमर जैन, अनंत जोशी, गणेश सोनवणे तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.

पदाधिकऱयाच्या जवळच्या लोकांना दिले काम
आयुक्तांशी बोलतांना महाजन म्हणाले, की भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या जवळच्या लोकांना खड्डे बुजविण्याचे कामे दिले. त्यांनी खड्डेच न बुजविता बिले काढून घेतली आहेत. त्यामुळे आज जळगावकरांना खड्डयांशी सामना करावा लागत आहे. यात तब्बल दोन कोटी रूपयांचा गैरव्यवहार या मधे झाला आहे. याची चौकशी करून संबधितावर कारवाई करावी अशी मागणीही त्यानी केली आहे. 

प्रभागात निधी देण्यात ही दुजाभाव 
शहराच्या विविध विकास कामांसाठी निधी मिळत असतो. त्यात प्रभागातील कामे करण्यासाठी सताधाऱयांकडून दुजाभाव केला जात आहे. खड्डे बुजविण्याचा मध्यतरी आलेला निधी तो भाजपच्या नगरसेवकांच्या प्रभागातच वापरला, असून सेनेच्या नगरसेवकांना निधी दिला जात नसल्याचा आरोपही यावेळी सुनील महाजन यांनी केला. ते म्हणाले, मध्यतंतरी खड्डे बुजविण्यासाठी निधी आला तो सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांच्या वार्डातच वापरण्यात आला. तसेच इतर विकास कामेही केवळ भाजपच्या नगरसेवकांच्या प्रभागात केली जातात. आमच्या प्रभागात ही नागरिक राहतात आम्हीही नगरसेवक आहोत. राज्यात आमची सत्ता असून त्या ठिकाणी भाजपचे आमदार आपल्या मतदार संघासाठी समान निधी मिळाला पाहिजे म्हणून मागणी करीत असतात. मग तोच नियम नगरसेवकांच्या निधील भाजपचे महापालिकेतील सत्ताधारी का लावत नाही असा प्रश्न महाजन उपस्थित केला.  

चौकशी केल्यानंतर बिले काढणार  
आयुक्त सतीश कुळकर्णी यांना निवेदन दिल्यानंतर माहिती देतांना सुनील महाजन म्हणाले, की आयुक्तांनी आमच्या मागण्या ऐकल्या असून शहरात ज्या ठिकाणी खड्डे बुजविण्यात आले, त्या ठिकाणच्या कामाची चौकशी केल्यानतंरच मक्तेदाराची बिले काढण्यात येईल असे आश्‍वासन दिले आहे.  तसेच सर्व प्रभागात समान विकास निधी देण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.   

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Corruption in pit repair work, Shiv Sena's agitation in the Commissioner's office demanding inquiry