`कोरोना' चे संकट...तरी हरिभाऊंच्या भेटीसाठी खडसे गेले मुंबईला 

`कोरोना' चे संकट...तरी हरिभाऊंच्या भेटीसाठी खडसे गेले मुंबईला 
Updated on: 

जळगाव  : "कोरोना'च्या संसर्गामुळे मुंबईत उपचारार्थ दाखल माजी खासदार तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष हरिभाऊ जावळे यांच्या भेटीसाठी माजीमंत्री एकनाथराव खडसेंनी नुकतीच मुंबई वारी केली. कोरोना संसर्गाच्या काळात प्रकृतीला असलेल्या धोक्‍याची चिंता न करता खडसेंनी मुंबई वारी करत हरिभाऊंसह त्यांच्या मुलाला दिलासा देण्याचा प्रयत्न केला. 

हरिभाऊंचे खडसेंशी पारिवारिक संबंध. 1990 पासून या दोघांसह गिरीश महाजन अशा तिघा "भाऊंनी' पक्षाची धुरा सांभाळली आणि पुढे वाहिली, वाढवलीही. खडसेंनी जसा हरिभाऊंना जीव लावला, तसा हरिभाऊंनीही खडसेंचा आयुष्यभर ज्येष्ठ नेते व त्यापलीकडे जाऊन थोरले बंधू म्हणून आदरच केला. या प्रेमाखातरच खडसेंनी हरिभाऊंच्या भेटीसाठी गेल्या आठवड्यात मुंबईची वाट धरली. एकीकडे कोरोनाचा संसर्ग वाढतोय, मुंबईतील स्थिती बिकट असताना खडसेंनी स्वत:च्या प्रकृतीची चिंता न करता मुंबई गाठली. बॉम्बे हॉस्पिटलला जाऊन हरिभाऊंची विचारपूस केली. त्यांच्या कक्षात जाणे शक्‍य नव्हते, मात्र फोनवरून त्यांनी संवाद साधला तेव्हा हरिभाऊंनाही गहिवरून आल्याचा अनुभव खडसेंनी सांगितला.

हरिभाऊंचे पुत्र अमोल यांच्याशी चर्चा करून खडसेंनी जावळे कुटुंबीयांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. हरिभाऊंच्या उपचारासाठी आवश्‍यक इंजेक्‍शन उपलब्ध होत नसताना याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय विभागाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने, सचिव संजय मुखर्जी यांच्याशी बोलून त्यांनी इंजेक्‍शन उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला. परंतु, हे प्रयत्न कमी पडले व नियतीने हरिभाऊंना हिरावून नेल्याची प्रतिक्रिया खडसेंनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केली. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Nandurbar bribery case
Jalgaon Engineer Incident
Jalgaon Mother and Son Case
Girna Dam Water Storage
Marathi News Esakal
www.esakal.com