रावेर शहराचा काही भाग अशांत घोषीत करा... जिल्हाधिकाऱ्यांचे गृह विभागाला पत्र

देविदास वाणी
सोमवार, 13 जुलै 2020

दंगलीत समाज घटकांनी एकमेकांवर दगडफेक करून वाहने जाळून चार लाख पाच हजार रुपये नुकसान केले आहे. तसेच घराना आग लावून संसारोपयोगी सामान जाळून रुपये 45 हजार नुकसान केले आहे.

जळगाव : रावेर शहरातीलकाही भाग अशांत क्षेत्र  महणून घोषीत करा असे पत्र जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी गृह विभागाचे अपर मुख्य सचिव यांना आज पाठविले आहे.

रावेर शहरातील नागझिरी, रसलपुर नाका, लेंडी पूरा, कोतवाल वाडा, चावडी चौक, शिवाजी चौक, भोईवाडा, संभाजीनगर, इमामवाडा, पंचशील चौक, बंडू चौक, खाटीक वाडा, मन्यार वाडा, गांधी चौक, हातेशा मस्जिद, ठडा भाग, पाराचा गणपती, महात्मा फुले चौक आठवडे बाजार याठिकाणी अशांत क्षेत्र म्हणून घोषितअशी मागणी जिल्हाधिकारी यांनी केली आहे.

पत्रातील मजकूर असा
22 मार्च 2020 रोजी या शहरात झालेला दंगलीत एकूण सहा गुन्हे दाखल झालेले असून त्याच्या तपशील यासोबत सादर करण्यात येत आहे.सदर दंगलीत समाज घटकांनी एकमेकांवर दगडफेक करून वाहने जाळून चार लाख पाच हजार रुपये नुकसान केले आहे. तसेच घराना आग लावून संसारोपयोगी सामान जाळून रुपये 45 हजार नुकसान केले आहे. सदर दंगली मुळे झालेल्या नुकसान आणि कायदा-सुव्यवस्था सार्वजनिक शांतता अबाधित राखण्याकरिता लावण्यात आलेले अतिरिक्त मनुष्यबळ व प्रशासनाचे झालेले एकूण नुकसान सहा कोटी वीस लाख 91 हजार एवढे नुकसान झाले आहे.

या दंगली वर नमूद केल्याप्रमाणे सार्वजनिक मालमत्तेची हानी, माणसाचा मृत्यू, जबर दुखापत या पार्श्वभूमीवर शहरातील नारी नाका लेंडी पुरी तलवाडा चावडी चौक शिवाजी चौक शाळा संभाजीनगर विमान बाळा पंचशील चौक बंडू चौक खाटीक का बाळा मण्यावर वाडा गांधी चौक खात्याचा मज्जित महात्मा फुले चौक आठवडे बाजार इत्यादी क्षेत्र हे महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 51 पोट कलम 1 नुसार अशांत क्षेत्र  महणून घोषीत करण्याबाबत ची अधिसूचना राजपत्रात प्रसिद्ध करण्यासाठी आवश्यक ती कारवाही होण्याची विनंती आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Declare part of Raver city unsettled Collector's letter to the Home Department