esakal | फडणवीसांना झाला कोरोना आणि परममित्र महाजन गेले धावून !
sakal

बोलून बातमी शोधा

फडणवीसांना झाला कोरोना आणि परममित्र महाजन गेले धावून !

फडणवीसांना कोरोना झाल्याने त्याच फोनची आठवण महाजनांना झाली आणि मित्राची काळजी घेण्यासाठी थेट विशेष विमान मुंबईवरून बोलावून ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले.

फडणवीसांना झाला कोरोना आणि परममित्र महाजन गेले धावून !

sakal_logo
By
सचिन जोशी

जळगाव ः राज्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात कोरोनाचा दौऱा केल्यानंतर कोरोनाची परिस्थीती बघून परममित्र माजी मंत्री व आमदार गिरीश महाजन यांना फोन करून की गिरीश मित्रा जर मला कोरोना झाला खासगी दवाखान्यात नको सरकारी दवाखान्यात उपचारासाठी दाखल कर असा सल्ला दिला होता. या फोनची व यावर झालेल्या ट्टिटची तीन-चार महिन्यापूर्वी चांगलीच चर्चा झाली होती. त्यातच आज फडणवीसांना कोरोना झाला व त्यांनीच सकाळी ट्विट करून याबाबत माहिती देखील दिली आहे. त्यामुळे परममित्र फडणवीसांनी त्यावेळच्या फोनची आठवण महाजनांनी झाली असवी आणी त्यांची काळजी घेण्यासाठी महाजनांनी तत्काळ विशेष विमान बोलावून मुंबईकडे धाव घेतली. फडणवीसांची काळजी घेण्यासाठी धाव घेतली आहे. 

जुलै महिन्यात राज्यात कोरोनाची भीषण परिस्थीती होती. त्यावेळी विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी दौरा करून भीषण परिस्थितीवरून गिरीश महाजनांना फोन केला होता. आणि या फोनच्या संभाषणाची राज्यात जोरदार चर्चा झाली होती. यात 'गिरीश, मला कोरोना झाला तर खासगी नव्हे सरकारी रुग्णालयात दाखल कर'  असं फडणवीसांनी महाजन यांना सांगितले होते. फडणवीसांचे हे शब्द ऐकून महाजनांच्या अंगावर शहारे आले होते. त्यात आज फडणवीसांना कोरोना झाल्याने त्याच फोनची आठवण महाजनांना झाली आणि मित्राची काळजी घेण्यासाठी थेट विशेष विमान मुंबईवरून बोलावून ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले. 

सरकारी रुग्णालयात दाखल करणार का ?

फडणवीसांनी कोरोना झाला तर खासगी नव्हे, सरकारी रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे महाजन मुंबईला येवून त्यांना खरच सरकारी रुग्णालयात दाखल करता का? हा प्रश्न आहे. तुर्तास तरी  फडणवीस हे घरीच क्वारंटाईन झालेले असून घरुनच उपचार घेत आहेत.

बिहारमध्ये फडवीसांना कोरोनाची लागण 

बिहार राज्यात सध्या निवडणूकाचा जोर वाढला असून तेथे प्रचाराची धुरा त्यांच्याकडे आहे. त्यात बिहारमध्येही पूरस्थितीच्या पाहणीसाठी फडणवीस गेले होते. आणि तेथेच त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे सांगितले जात आहे.
 

संपादन- भूषण श्रीखंडे