esakal | जळगाव जिल्हा बँकेत पाच हजार विद्यार्थ्यांची खाती उघडली!
sakal

बोलून बातमी शोधा

Student

जळगाव जिल्हा बँकेत पाच हजार विद्यार्थ्यांची खाती उघडली!

sakal_logo
By
देविदास वाणी

जळगाव ः जळगाव जिल्हा बँकेच्या (Jalgaon District Bank) सर्व शाखांमध्ये पहिल्याच दिवशी झीरो बॅलन्सवर पाच हजार विद्यार्थ्यांची (account) खाती उघडण्यात आली, अशी माहिती जिल्हा बॅंकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख यांनी दिली. (jalgaon district bank five hundred student open account)

हेही वाचा: Photos:कच्चे पनीर खा..आणि लठ्ठपणा दुर करा!


शालेय विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार योजनेचे पैसे प्रत्यक्ष त्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहेत. यासाठी राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये विद्यार्थ्यांना खाते उघडण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे झीरो बॅलन्स खाते जिल्हा बँकांच्या शाखेत घडण्यास परवानगी द्यावी, असा प्रस्ताव जिल्हा मध्यवर्ती बँकेने जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला दिला होता. या प्रस्तावाला जिल्हा परिषदेकडून ग्रीन सिग्नल मिळाला.


जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने शालेय पोषण आहार योजनेच्या निधीसाठी विद्यार्थ्यांचे आधार लिंक असलेले झीरो बॅलन्स खाते उघडण्यात यावे, असे पत्र जिल्हा बँकेला दिले होते. जिल्हा बँकेने सर्व शाखांना परिपत्रक काढून विद्यार्थ्यांचे खाते प्राधान्याने उघडण्याबाबत सूचना दिल्या. त्याची अंमलबजावणी सोमवारपासून जिल्हा बँकेच्या विविध शाखांमध्ये सुरू झाली आहे. सायंकाळपर्यंत चार ते पाच हजार विद्यार्थ्यांनी पालकांच्या मदतीने झीरो बॅलन्सवर खाती उघडली आहेत.

हेही वाचा: शेतात कामाला गेलेल्या महिलेचा गळा चिरून खून

पोषण आहारासाठी बँकेत आधार लिंक असलेले खाते उघडणे आवश्‍यक आहे. मात्र, राष्ट्रीयीकृत बँका विद्यार्थ्यांचे जाँइंट खाते झीरो बॅलन्सद्वारे उघडण्यास तयारी नाहीत. विद्यार्थ्यांना प्रतिसाद मिळत नसल्याने ते या लाभापासून वंचित राहणार होते. यामुळे आम्ही विद्यार्थ्यांचे मोफत खाते उघडण्यासाठी पुढाकार घेतला.
-ॲड. रोहिणी खडसे, अध्यक्षा, जिल्हा बँक

loading image