जळगावकरांनो सावधान..३ ते ६ ऑगस्टदरम्यान मुसळधार पाऊस

जूनच्या शेवटच्या आठवड्यापासून ते १० जुलैपर्यंत पावसाने ओढ दिली होती. नंतर कमी-अधिक प्रमाणात पाऊस सुरू आहे.
Heavy Rain
Heavy RainHeavy Rain


जळगाव ः जिल्ह्यात जुलैअखेरपर्यंत काही ठिकाणीच पाऊस पडेल. मात्र ३ ते ६ ऑगस्टदरम्यान मुसळधार पावसाचा (Heavy Rain) अंदाज हवामानतज्ज्ञांनी (Meteorologists)वर्तविला आहे. गेल्या पाच वर्षांपासून जुलै महिन्यात पडणाऱ्या पावसाचे प्रमाण वर्षानुवर्षे कमी कमी होत आहे. जिल्ह्यात महामार्गाच्या कामासाठी झालेली प्रचंड वृक्षतोड, शेती (Farm) विकून त्यावर बांधकामासाठी होत असलेली वृक्षतोड, हेच मुख्य कारण असल्याचे हवामानतज्ज्ञ सांगतात.

(jalgaon district chance of heavy rains in early august)

Heavy Rain
उपमहापौरांवर नक्की गोळीबार झाला का? कुठल्याही खाणाखुणा नाही


जूनच्या शेवटच्या आठवड्यापासून ते १० जुलैपर्यंत पावसाने ओढ दिली होती. नंतर कमी-अधिक प्रमाणात पाऊस सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ५७ टक्के पाऊस झाल्याचे महसूल विभाग सांगते. रोज आकाशात ढग गर्दी करतात. मात्र, पाऊस पडत नाही. काही वेळातच आकाश स्वच्छ होते. याचा अर्थ पावसाच्या ढगांना गार हवा मिळत नाही. ती मिळण्यासाठी झाडांची गर्दी असणे आवश्‍यक आहे. तरसोद ते फागणे, तरसोद ते चिखलीदरम्यान महामार्गाच्या चौपदरीकरणादरम्यान गेल्या चार वर्षांत प्रचंड वृक्षतोड झाली. त्या प्रमाणात वृक्षलागवडीचे प्रमाण केवळ दहा टक्के आहे. पर्यावरणाचा ऱ्हास झाल्यानेच जळगाव जिल्हा उन्हाळ्यात ‘हॉट’ असतो. जळगावचे तापमान ४७ अंशांपर्यंत जाते. तापमान कमी करायचे असेल, चांगला पाऊस हवा असेल तर घरोघरी वृक्षलागवड मोहीम, मोकळ्या जागेत वृक्षलागवड करणे गरजेचे असल्याचे हवामानतज्ज्ञ सांगतात. सॅटेलाइटद्वारे आकाशातील पावसाची स्थिती पाहिली असता, येत्या ३१ जुलैपर्यंत पाऊस कधी कमी, कधी जास्त पडेल. मात्र, ३ ते ६ ऑगस्टदरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

Heavy Rain
अहो आश्चर्यम्..शेतातील नुकसान भरपाईपोटी मिळाले फक्त 270 रुपये

जुलैत सर्वांत कमी पाऊस
गेल्या पाच- सहा वर्षांचे पावसाचे जुलै महिन्यातील गणित पाहता जुलै महिन्यात कमी पाऊस पडत असल्याचे चित्र आहे.

काही वर्षांची आकडेवारी अशी
२०१३ - ४११ मिलिमीटर
२०१४ - ३२८
२०१५ - ६२
२०१६ - ३४८
२०१७ - २६०
२०१८ - १४५
२०१९ - १९०
२०२० - ११०
२०२१- ५७

Heavy Rain
जळगावात लसीकरण केंद्रावर गोंधळ सुरूच; नागरिकांची उसळली गर्दी


जुलै महिन्यात पावसाचे प्रमाण घटत आहे. याला कारण पर्यावरणाचा ऱ्हास आहे. पर्यावरण रक्षणासाठी सर्वांनीच प्रयत्न करणे गरजेचे आहे. सध्या ढग येतात. मात्र, पाऊस पडत नाही. याला कारण पावसाला पोषक वातावरण निर्माण होत नाही.
-नीलेश गोरे, संचालक, वेलनेस वेदर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com