आत्महत्याग्रस्त शेतकऱयाच्या घरी अचानक जिल्हाधिकारी पोहचले !

आत्महत्याग्रस्त शेतकऱयाच्या घरी अचानक जिल्हाधिकारी पोहचले !
Updated on: 

धरणगाव : भोणे तालुका धरणगाव येथे आत्महत्या केलेल्या शेतकऱयाच्या घरी जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी अचानक घरी जावून कुटूंबाची भेट घेतली. यावेळी शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळाला की नाही याबाबत चौकशी केली लाभ मिळाला नसेल तर तातडीने देण्यात यावा याबाबत सूचना संबधितांना केल्या.

जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी शनिवारी मौजे भोणे येथे उभारी योजनेअंतर्गत आत्महत्याग्रस्त शेतकरी कै युवराज पाटील यांच्या कुटुंबाची भेट घेतली, या भेटीत त्यांनी त्यांच्या वारसांची आस्थेने चौकशी केली तसेच पुरवठा विभानंतर्गत धान्याचे वाटप केले.सदर वारसांना सिंचन विहीर, संगायो लाभ,बचत गट लाभ व इतर योजनांचे लाभ देण्याचे सुचित केले. तत्पूर्वी त्यांनी कृषी विभागाच्या धरणगाव येथील अनिल कणखरे यांच्यापीक कापणी प्रयोगाच्या प्लॉट ला भेट दिली.

शेतात उभे राहून केली पाहणी

जिल्हाधिकारी यांनी स्वतः समक्ष शेतात उभे राहून कापूस वेचणी व कापसाचे मोजमाप करून घेतले.तद्नंतर मौजे भोणे येथे लक्ष्मीनारायण मंदिर परिसरात कृषी विभागाच्या औजार बँकेचे उद्घाटन करण्यात आले.याप्रसंगी प्रांताधिकारी विनय गोसावी,तहसीलदार नितीनकुमार देवरे,उपविभागीय कृषी अधिकारी सुभाष जाधवर,तालुका कृषी अधिकारी अनिल माळी, मंडळ अधिकारी वनराज पाटील,तलाठी अविनाश पाटील,लिपिक गणेश पवार इ हजर होते.

संपादन- भूषण श्रीखंडे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Nandurbar bribery case
Jalgaon Engineer Incident
Jalgaon Mother and Son Case
Girna Dam Water Storage
Marathi News Esakal
www.esakal.com