जळगाव जिल्ह्यात वरिष्ठ महाविद्यालये बुधवार पासून गजबजणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

College

जळगाव जिल्ह्यात वरिष्ठ महाविद्यालये बुधवार पासून गजबजणार


जळगाव ः राज्यातील सर्व विद्यापीठ, महाविद्यालये (College) सुरू करण्याबाबत राज्य शासनाकडून (State Government) मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार येत्या बुधवारपासून जिल्ह्यातील वरिष्ठ महाविद्यालये सुरू करण्यात येणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांचे कोविड प्रतिबंधात्मक (Covid restrictive) लसीचे दोन (Vaccination) डोस पूर्ण झालेले आहेत अशाच विद्यार्थ्यांना उपस्थित राहता येणार आहे.

हेही वाचा: चुंचाळे: लोकनियुक्त सरंपचाचे भवितव्य ग्रामस्थांच्या हाती..कोरोना संसर्ग प्रादूर्भाव टाळण्यासाठी जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालये, महाविद्यालये १५ मार्च २०२० पासून बंद करण्याच्या सूचना राज्य शासनाने दिल्या होत्या. २४ मार्चपासून लॉकडाउन संचारबंदी लागू करण्यात आली होती. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीचा अवलंब करून महाविद्यालयीन शिक्षण सुरू होउन परिक्षा देखिल ऑनलाईन घेउन पुढील वर्गात विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला. त्यानंतर तब्बल १० ते ११ महिन्यांनंतर १५ फेब्रुवारीपासून ५० टक्के उपस्थिती आदेशानुसार महाविद्यालये सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले होते. परंतु पुन्हा संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमुळे १० मार्च २०२१ पासून पुढील आदेश येईपर्यंत महाविद्यालये बंद करण्यात आली होती.जून २०२१ नंतर संसर्ग साखळी खंडीत झाल्याने ऑगस्टनंतर टप्प्याटप्प्याने ८ वी ते १० वी, ४ ऑक्टोबरनंतर ११ वी, १२ वीचे वर्ग सुरू करण्यात आले. त्यानंतर शासन निर्देशासह जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या अंतर्गत स्थानिक परिस्थिती व प्रतिबंधित प्रक्षेत्रांचे नियोजन व आरोग्यविषयक पायाभूत सेवा सुविधांची उपलब्धता लक्षात घेउन कोविडसंसर्ग नियमावली मार्गदर्शक सूचना मानक या नियमांचे पालन करून १८ वर्षे वयोगटावरील विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश देण्यात येणार आहे.

हेही वाचा: अंजनी धरण ओव्हर फ्लो..दोन हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग

ज्या विद्यार्थ्यांनी संसर्ग प्रतिबंधात्मक लसीचे दोन डोस घेतलेले आहेत अशाच विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रत्यक्ष उपस्थित रहाण्याची परवानगी देण्यात आली आहे. महाविद्यालये, विद्यार्थ्यांनी कोरोना संसर्गाचे नियम पाळावे व सुरक्षित राहावे.

- अभिजीत राऊत, जिल्हाधिकारी

Web Title: Marathi News Jalgaon District College Start

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top