esakal | जळगाव जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत चढ-उतार सुरूच
sakal

बोलून बातमी शोधा

corona

जळगाव जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत चढ-उतार सुरूच

sakal_logo
By
टीम ई सकाळ

जळगाव : जिल्ह्यात कोरोनाचा (Corona) संसर्ग आटोक्यात येत असून, महिनाभरापासून दैनंदिन रुग्णसंख्येत (Patient) चढ-उतार सुरू आहे. गुरुवारी (ता. ८) १४ नवे बाधित आढळून आले. पैकी दहा तालुक्यांत एकही नवा रुग्ण सापडला नाही, तर ३२ जण बरे झाले.
(jalgaon district corona fluctuations in patient numbers)

हेही वाचा: पावसाअभावी पिके करपू लागली; दुबार पेरणीचे संकट!

जळगाव जिल्ह्यात दोन महिन्यांपासून सातत्याने रुग्णसंख्येत घट होत असून, कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात येत आहे. जुलैमध्ये रोज आढळून येणाऱ्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक असा ट्रेंड कायम आहे. मात्र, रोजच्या रुग्णसंख्येत कमी-जास्त असा चढ-उतार सुरूच असून, गुरुवारी १४ नवे रुग्ण सापडले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या एक लाख ४२ हजार ४२४ झाली. २४ तासांत एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. ३२ रुग्ण बरे झाल्यानंतर बरे होणाऱ्यांचा आकडा एक लाख ३९ हजार ५३८ वर पोचला आहे. सध्या जिल्ह्यात ३१३ सक्रिय रुग्ण असून, दुसऱ्या टप्प्यातील सक्रिय रुग्णांची ही सर्वांत कमी संख्या आहे.

हेही वाचा: कोणत्या दिवशी खावी कोणती डाळ ? जाणून घ्या!


दहा तालुक्यांत रुग्ण नाही
गुरुवारी चार हजार ७८२ चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाले. त्यात दहा तालुक्यांत एकही रुग्ण समोर आला नाही. तर जळगाव शहर चार, जळगाव ग्रामीण एक, भुसावळ एक, पाचोरा एक, धरणगाव एक, चाळीसगाव पाच, असे रुग्ण आढळून आले.

loading image